संग्रहित छायाचित्र 
बिझनेस

अनिल अंबानी यांच्या निवासस्थानी CBI चा छापा; १७ हजार कोटींच्या बँक फसवणुकीची चौकशी

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) १७,००० कोटी रुपये बँक कर्ज फसवणूक प्रकरणी उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर कारवाई केली आहे. शनिवारी (दि.२३) सकाळी CBI च्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील कफ परेड येथील सीविंड अपार्टमेंटमधील त्यांच्या घरावर छापा टाकला.

नेहा जाधव - तांबे

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) १७,००० कोटी रुपये बँक कर्ज फसवणूक प्रकरणी उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर कारवाई केली आहे. शनिवारी (दि.२३) सकाळी CBI च्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील कफ परेड येथील सीविंड अपार्टमेंटमधील त्यांच्या घरावर छापा टाकला. सकाळी सातच्या सुमारास तपास अधिकाऱ्यांनी अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीच घराची झाडाझडती घेतली.

SBI ने १३ जून रोजी आरकॉम व अनिल अंबानी यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केल्यानंतर या प्रकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर २४ जून रोजी बँकेने RBI ला याबाबत अहवाल दिला. २४ जुलै रोजी, ED ने येस बँक कर्ज घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अंबानी यांच्या कंपन्यांशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकले. ED च्या प्राथमिक तपासात येस बँकेने दिलेले सुमारे ३,००० कोटी रुपयांच्या कर्जाचा गैरवापर झाल्याचे समोर आले. यामुळे ED ने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावला. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी सुमारे १० तास अंबानींची ED कडून चौकशी करण्यात आली.

येस बँकेकडून घेतलेल्या कर्जातील निधी शेल कंपन्यांच्या माध्यमातून गैरवापर केल्याची शंका ED ला आहे. या अनियमित व्यवहारांची चौकशी सुरू असतानाच आता CBI ने देखील अंबानींच्या घरावर छापेमारी केली आहे. यामुळे अनिल अंबानी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेस आमदार ED च्या रडारवर! के.सी. वीरेंद्र सिक्कीममधून अटकेत; गोव्यात पाच कॅसिनो अन् कोट्यवधी रुपयांची उलाढाल

धक्कादायक! मुंबई-कुशीनगर एक्स्प्रेसच्या बाथरूममध्ये आढळला चिमुकलीचा मृतदेह

२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल सक्तीला सुप्रीम कोर्टात आव्हान

OBC त २९ नव्या जातींचा समावेश करण्याच्या हालचाली; राज्य मागासवर्ग आयोगाकडून प्रस्ताव; केंद्र सरकार घेणार अंतिम निर्णय

शेतकऱ्यांची योग्य वेळी कर्जमाफी करू! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन; आत्महत्या न करण्याचे आवाहन