बँका, एनबीएफसींनी मुदतठेवी खात्यांसाठी नामांकन प्राप्त करावे; आरबीआयची सूचना संग्रहित छायाचित्र
बिझनेस

बँका, एनबीएफसींनी मुदतठेवी खात्यांसाठी नामांकन प्राप्त करावे; आरबीआयची सूचना

भारतीय रिझर्व्ह बँकेने बँका आणि मुदतठेवी घेणाऱ्या नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांना सध्याच्या आणि नवीन ग्राहकांकडून सर्व ठेव खाती, सुरक्षित राहण्यासाठी आणि सेफ्टी लॉकर्ससाठी काटेकोरपणे ग्राहकांकडून नामांकन प्राप्त करून घेण्यास सांगितले आहे.

Swapnil S

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने बँका आणि मुदतठेवी घेणाऱ्या नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांना सध्याच्या आणि नवीन ग्राहकांकडून सर्व ठेव खाती, सुरक्षित राहण्यासाठी आणि सेफ्टी लॉकर्ससाठी काटेकोरपणे ग्राहकांकडून नामांकन प्राप्त करून घेण्यास सांगितले आहे. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी एका प्रसिद्धीपत्रकात वरील सूचना केली.

अनेक मुदतठेवी खात्यांसाठी नामांकन उपलब्ध नव्हते आणि म्हणून, जिवंत असलेल्या किंवा मृत ठेवीदारांच्या कुटुंबातील सदस्यांना होणारी गैरसोय आणि अवाजवी त्रास टाळण्याचे निरीक्षण नोंदवत रिझर्व्ह बँकेने नामांकन आवश्यकतेचा पुनरुच्चार केला.

नियामकाने असेही म्हटले आहे की, बँकांनी संवेदनशील होऊन नामांकन मिळविण्यासाठी तसेच मृत व्यक्तींचे दावे हाताळण्यासाठी आणि नामनिर्देशित किंवा कायदेशीर वारसांशी व्यवहार करण्यासाठी शाखांमधील त्यांच्या ‘फ्रंटलाइन’ कर्मचाऱ्यांकडून हे काम करुन घेतले पाहिजे. बँकेने नामांकनाच्या कामकाजाचा वेळोवेळी आढावा घेतला पाहिजे आणि ३१ मार्चपासून त्रैमासिक आधारावर रिझर्व्ह बँकेला अहवाल द्यावा.

आरबीआयने म्हटले आहे की, ठेवीदारांना नामांकनाचा लाभ घेण्याचा किंवा निवड रद्द करण्याचा पर्याय देऊन बँका मुदतठेवी खाती उघडण्यासाठी त्यांच्या अर्जामध्ये बदल करू शकतात.

Video : मित्रानेच केला गेम! फेसबुक किंग बंटी दीक्षितचा निर्घृण खून; आधी कारने स्कूटरला उडवलं, नंतर...

सातारा जिल्हा बँकेच्या नऊ जागा बिनविरोध; दहा वर्षांच्या संचालकपदाचा दिग्गजांना फटका, निवडणुकीत मोठी माघार

Wardha : पोलिसांसमोरच आरोपीने महिला डॉक्टरला लगावली जोरदार थप्पड; डॉक्टरांकडून कारवाईची मागणी, CCTV व्हिडीओ व्हायरल

Mumbai : भुलेश्वरमध्ये जुन्या भूमिगत केबल्स बदलणार; २०० कोटी रुपये खर्च, बेस्टचा निर्णय

Mumbai : कथित शिकारीप्रकरणी चितेच्या राखेची तपासणी; दोन छर्रे आणि अर्धवट जळालेला मोबाईल जप्त, दोघांना कोठडी