Photo: Twitter
बिझनेस

झी आणि सोनी विलीनीकरणाचा मार्ग मोकळा; वादावर यशस्वी तोडगा निघाल्याचे उभय कंपन्यांकडून जाहीर, सर्व खटले मागे घेण्यास सहमती

झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया यांच्यातील विलीकरणराचा मार्ग मोकळा झाला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया यांच्यातील विलीकरणराचा मार्ग मोकळा झाला आहे. उभय कंपन्यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांनी १० अब्ज डॉलर्सच्या अयशस्वी विलीनी-करणाशी संबंधित त्यांच्यातील वादावर तोडगा काढला आहे आणि एकमेकांवरील सर्व दावे मागे घेण्यास सहमती दर्शविली आहे.

नूतनीकरणाच्या उद्देशाने भविष्यातील वाढीच्या संधींचा स्वतंत्रपणे पाठपुरावा करण्यासाठी आणि कंपन्यांमधील परस्पर समंजसपणामुळे हा तोडगा निघाला आहे. सर्व वादांवर निश्चित तोडगा काढण्यात आला आहे, असे दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड आणि कल्वर मॅक्स एन्टरटेन्मेंट प्रा. लि. लि. (सीएमईपीएल) यांच्यातील विलिनीकरणविषयक करार आणि संमिश्र योजनेच्या व्यवस्थेशी संबंधित सर्व वादांचे सौहार्दपूर्णपणे वातावरणात निराकरण करून सर्वसमावेशक ‘नॉन-कॅश सेटलमेंट’वर पोहोचले आहे, असे त्यात म्हटले आहे.

करारांतर्गत, कंपन्यांनी सिंगापूर आंतरराष्ट्रीय लवाद केंद्रात (एसआयएसी) सुरू असलेल्या आणि राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) आणि इतर मंचांमध्ये सुरू केलेल्या सर्व संबंधित कायदेशीर खटल्यांमध्ये एकमेकांविरुद्धचे सर्व संबंधित दावे मागे घेण्यास परस्पर सहमती दर्शविली आहे, असेही उभय कंपन्यांनी म्हटले आहे.

उभय कंपन्या एनसीएलटीकडून संबंधित योजना देखील मागे घेतील आणि संबंधित नियामक प्राधिकरणांना सूचित करतील. या वर्षी जानेवारीमध्ये सोनीने झी कंपनीद्वारे काही अटी पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यामुळे झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड सोबत प्रस्तावित १० अब्ज अमेरिकन डॉलरच्या विलीनीकरणातून माघार घेतली होती. हा करार जाहीर केल्यानंतर दोन वर्षांहून अधिक काळ लोटला. त्यानंतर दोन्ही पक्ष न्यायालयात गेले होते.

सोनीसोबत वाद मिटवल्यानंतर झी एंटरटेनमेंटच्या शेअर्समध्ये सुमारे १२ टक्क्यांची वाढ

सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया आणि झी एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट लिमिटेड (ZEEL) यांच्यातील वाद सहा महिन्यानंतर मिटल्यानंतर झी एन्टरटेन्मेंटच्या शेअर्समध्ये मंगळवारी सुमारे १२ टक्क्यांनी वाढ झाली. बीएसईवर समभाग ११.४५ टक्क्यांनी वाढून १५०.८५ रुपयांवर बंद झाले. दिवसभरात तो १४.२५ टक्क्यांनी वाढून १५४.६५ रुपयांवर पोहोचला होता. एनएसईवर झी एन्टरटेन्मेंटचे समभाग ११.६१ टक्क्यांनी वाढून प्रत्येकी १५०.९० रुपयांवर पोहोचले. त्यामुळे कंपनीचे बाजारमूल्य १,४८८.८१ कोटी रुपयांनी वाढून १४,४८९.४४ कोटी रुपयांवर पोहोचले.

BMC Election 2026 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर ; एकूण ९४ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात, वाचा सर्व उमेदवारांची नावे

BMC Election 2026 : शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले; कोणत्या प्रभागात कोणाला संधी?

आधी लाथा-बुक्क्या, आता जादू की झप्पी; व्हायरल झालेल्या 'त्या' डॉक्टर आणि पेशंटचं भांडण मिटलं, नेमकं प्रकरण काय?

'मला सतत मेसेज करायचा'...; सूर्यकुमार यादवबाबत खळबळजनक दावा करणारी खुशी मुखर्जी कोण?

चीनचा तीळपापड! 'इतिहास बदलू शकत नाही'; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चा ट्रेलर बघून तीव्र प्रतिक्रिया