नवी दिल्ली : अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या जिओने स्टारलिंकची ब्रॉडबँड इंटरनेट सेवा भारतात आणण्यासाठी मस्कच्या स्पेसएक्स या एरोस्पेस कंपनीसोबत करार केला आहे. विशेष म्हणजे एअरटेलने काल करार केल्याचे जाहीर केल्यानंतर लगेचच अंबानींच्या जिओनेही मस्क यांच्या कंपनीशी करार केल्याचे बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे. प्रतिस्पर्धी कंपन्या असलेल्या एअरटेल आणि जिओ यांनी मस्क यांच्या कंपनीशी करार केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या मस्कसोबतचा करार सुनील भारती मित्तल यांच्या भारती एअरटेलने स्पेसएक्स सोबत अशाच भागीदारी करारावर स्वाक्षरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अंबानी यांच्या जिओनेही करार केला.
गेल्या काही महिन्यांत, भारतातील उपग्रह सेवांसाठी स्पेक्ट्रम प्रदान करण्यासाठी लिलावाची मागणी करण्यासाठी प्रतिस्पर्धी जिआरे आणि एअरटेल एकत्र आले होते कारण त्यांना प्रशासकीय वाटपामुळे मस्क यांना ‘एअरवेव्हज’ पूर्वीच्या लिलावांद्वारे भरलेल्या किंमतीपेक्षा कमी किमतीत मिळतील अशी भीती होती.