प्रातिनिधिक फोटो
बिझनेस

ठेवींच्या वाढीपेक्षा पतवाढीमुळे बँकांसमोरआव्हान, अहवालाचा निष्कर्ष

पतवाढ ही ठेवींच्या वाढीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे बँकिंग प्रणालीसाठी निधीचे आव्हान निर्माण होऊ शकते, असे मंगळवारी एका अहवालात म्हटले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पतवाढ ही ठेवींच्या वाढीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे बँकिंग प्रणालीसाठी निधीचे आव्हान निर्माण होऊ शकते, असे मंगळवारी एका अहवालात म्हटले आहे. कर्जाच्या वाढीचा वेग कायम ठेवण्यासाठी ठेवी वाढवणे आणि पतपुरवठ्याचा खर्च कमी ठेवण्यास बँकांचे प्राधान्य आहे, असे ‘फिक्की - आयबीए’ अहवालात म्हटले आहे.

सर्वेक्षणाच्या सध्याच्या फेरीत एकूण ठेवींपैकी दोन तृतीयांश पेक्षा जास्त बँकांनी (६७ टक्के) चालू खाते बचत खात्यातील (कासा) ठेवींमध्ये घट झाल्याचे म्हटले आहे, असे त्यात म्हटले आहे.

उच्च/आकर्षक व्याजदरांमुळे बँकांमधील मुदतठेवी वाढत आहेत. ८० टक्के सहभागी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी २०२४ च्या पहिल्या सहामाहीत ‘कासा’ ठेवींमध्ये घट झाल्याचे म्हटले आहे तर निम्म्याहून अधिक खाजगी क्षेत्रातील बँकांनी प्रतिसादकर्त्यांनी ‘कासा’ ठेवींमध्ये घट नोंदवली, असे म्हटले आहे.

‘फिक्की - आयबीए’ सर्वेक्षणाची १९ वी फेरी जानेवारी ते जून २०२४ या कालावधीसाठी पार पडली. सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील आणि परदेशी बँकांसह एकूण २२ बँकांनी सर्वेक्षणात भाग घेतला. मालमत्तेच्या आकारानुसार वर्गीकृत केल्याप्रमाणे या बँका एकत्रितपणे बँकिंग उद्योगाच्या सुमारे ६७ टक्के प्रतिनिधित्व करतात.

बहुसंख्य (७१ टक्के) बँकांनी गेल्या सहा महिन्यांत एनपीएमध्ये घट झाल्याचे सांगितले. प्रतिसाद देणाऱ्या सरकारी बँकांपैकी लक्षणीय ९० टक्के बँकांनी एनपीएमध्ये घट झाल्याचे नमूद केले आहे तर सहभागी खासगी क्षेत्रातील बँकांपैकी ६७ टक्क्यांनी घट झाल्याचे सांगितले.

पायाभूत सुविधा, धातू, लोह आणि पोलाद यांसारख्या क्षेत्रांसाठी दीर्घकालीन पत मागणीत सतत वाढ झाल्याचे सर्वेक्षणाचे निष्कर्ष दर्शवतात. पायाभूत सुविधांमध्ये कर्ज प्रवाहात वाढ होत आहे आणि ७७ टक्के प्रतिसादकर्त्यांनी दीर्घ मुदतीच्या कर्जात वाढ झाल्याचे सूचित केले आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी सरकारच्या भांडवली खर्चाच्या दबावामुळे असे होऊ शकते, असे अहवालात म्हटले आहे.

अहवालानुसार, बँका आणि फिनटेक कंपन्यांमधील भागीदारीमध्ये नावीन्य आणण्यासाठी, सेवा वितरणात सुधारणा करण्यासाठी आणि आर्थिक समावेश वाढवण्याची अपार क्षमता आहे. बँकांना सायबर-जोखीम व्यवस्थापनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उपाययोजना सामायिक करण्यास सांगितले होते.

बँकांना एटीएम सेवा किफायतशीर बनविण्यासाठी सूचना करण्यास सांगितले होते. त्याबाबत म्हटले आहे की, यासंदर्भात केलेल्या प्रमुख सूचनांमध्ये ऑपरेशनल खर्च कमी करण्यासाठी विविध उपायांचा समावेश आहे. मोक्याची ठिकाणे निवडणे, एटीएम व्यवहारांसाठी अदलाबदल शुल्क वाढवणे, प्रत्येकासाठी खर्च आणि फायद्यांचे विश्लेषण करणे. एटीएम साइट, एटीएममधील तंत्रज्ञान अपग्रेड करणे इ. सूचना करण्यात आल्या.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी