नवी दिल्ली : एप्रिल २००० ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत भारतातील थेट परकीय गुंतवणुकीने (एफडीआय) एक ट्रिलियन अमेरिकन डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे देशाची प्रतिष्ठा नक्कीच वाढली आहे. जागतिक स्तरावर एक सुरक्षित आणि प्रमुख गुंतवणूक केंद्र म्हणून देशाचे महत्त्व वाढले आहे.
डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (डीपीआयआयटी) च्या आकडेवारीनुसार, या कालावधीत इक्विटी, पुनर्गुंतवणूक केलेली कमाई आणि इतर भांडवलासह एफडीआयची एकत्रित रक्कम १,०३३.४० अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. सुमारे २५ टक्के एफडीआय मॉरिशस मार्गाने आले. त्यापाठोपाठ सिंगापूर (२४ टक्के), अमेरिका (१० टक्के), नेदरलँड (७ टक्के), जपान (६ टक्के), यूके (५ टक्के), यूएई (३ टक्के) आणि केमन बेटे, जर्मनी आणि सायप्रसचा वाटा प्रत्येकी २ टक्के आहे. आकडेवारीनुसार, वरील कालावधीत भारताला मॉरिशसमधून १७७.१८ अब्ज डॉलर, सिंगापूरकडून १६७.४७ अब्ज डॉलर आणि ६७.८ अब्ज डॉलर मिळाले आहेत. त्यातील जास्तीत जास्त प्रवाह आकर्षित करणाऱ्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सेवा विभाग, संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, दूरसंचार, व्यापार, बांधकाम विकास, ऑटोमोबाईल, रसायने आणि फार्मास्युटिकल्स यांवाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, २०१४ पासून भारताने ६६७.४ अब्ज अमेरिकन डॉलर (२०१४-२४) ची एकत्रित थेट विदेशी गुंतवणूक आकर्षित केली आहे, जी मागील दशकाच्या (२००४-१४) तुलनेत ११९ टक्क्यांनी वाढली आहे. हा गुंतवणुकीचा ओघ ३१ राज्ये आणि ५७ क्षेत्रांमध्ये झाला आहे. त्यामुळे विविध उद्योगांमध्ये वाढ होत आहे. धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची क्षेत्रे वगळता बहुतांश क्षेत्रे स्वयंचलित मार्गाने १०० टक्के एफडीआयसाठी खुली आहेत.
२०२५ मध्ये भारतातील विदेशी गंगाजळी परकीय चलनाला गती मिळण्याची शक्यता आहे, कारण उत्तम आर्थिक स्थिती, चांगले औद्योगिक उत्पादन आणि आकर्षक पीएलआय योजना भू-राजकीय गोंधळात परदेशातील कंपन्यांना अधिक आकर्षित करतील, असे तज्ज्ञांनी सांगितले. जागतिक आव्हाने असूनही, भारत अजूनही पसंतीचे गुंतवणुकीचे ठिकाण आहे, असे ते पुढे म्हणाले.
बहुतांश क्षेत्रांमध्ये स्वयंचलित मार्गाने एफडीआयला परवानगी आहे, तर दूरसंचार, मीडिया, फार्मास्युटिकल्स आणि विमा यांसारख्या क्षेत्रात विदेशी गुंतवणूकदारांसाठी सरकारची परवानगी आवश्यक आहे. सरकारी मान्यता मार्गांतर्गत, परदेशी गुंतवणूकदाराला संबंधित मंत्रालय किंवा विभागाकडून पूर्व संमती घ्यावी लागते, तर स्वयंचलित मार्गानुसार, परदेशी गुंतवणूकदाराने गुंतवणूक केल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला माहिती देणे आवश्यक असते सध्या काही क्षेत्रात एफडीआयला बंदी आहे. लॉटरी, जुगार आणि सट्टेबाजी, चिट फंड, निधी कंपनी, रिअल इस्टेट व्यवसाय आणि तंबाखू वापरून तयार केलेली सिगार, चेरूट्स, सिगारिलो आणि सिगारेटचे उत्पादन.
भारतासाठी एफडीआय महत्त्वाचा आहे कारण पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी येत्या काही वर्षांत मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे. परकीय चलनाचा मोठा साठा देखील देयकांचे संतुलन आणि रुपयाचे मूल्य राखण्यास मदत करते.
एफडीआय इक्विटीचा ओघ १६५.१ अब्ज अमेरिकन डॉलरवर
गेल्या दशकात (२०१४-२४) उत्पादन क्षेत्रात एफडीआय इक्विटीचा ओघ १६५.१ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचला आहे, जो मागील दशकाच्या (२००४-१४) तुलनेत ६९ टक्क्यांनी वाढला आहे. त्यामध्ये ९७.७ अब्ज डॉलरचा प्रवाह होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. भारत हे एक आकर्षक आणि गुंतवणूकदार-अनुकूल केंद्र राहील याची खात्री करण्यासाठी, सरकार एफडीआय धोरणाचा सतत आढावा घेते आणि भागधारकांशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर वेळोवेळी बदल करते.