बिझनेस

सोने ८००ने वाढून ९८,८२० रुपयांवर; चांदी २००० रुपयांनी वाढून १ लाख १२ हजार प्रति किलो

राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किमती ८०० रुपयांनी वाढून ९८,८२० रुपये प्रति १० ग्रॅम झाल्या. ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा दर मागील सत्रात ९८,०२० रुपये प्रति १० ग्रॅम होता, असे अखिल भारतीय सराफा असोसिएशनने मंगळवारी सांगितले.

Swapnil S

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किमती ८०० रुपयांनी वाढून ९८,८२० रुपये प्रति १० ग्रॅम झाल्या. ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा दर मागील सत्रात ९८,०२० रुपये प्रति १० ग्रॅम होता, असे अखिल भारतीय सराफा असोसिएशनने मंगळवारी सांगितले.

राष्ट्रीय राजधानीत ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचा भाव मंगळवारी ७०० रुपयांनी वाढून ९८,५०० रुपये प्रति १० ग्रॅम (सर्व कर समाविष्ट) झाला. सोमवारी हा मौल्यवान धातू प्रति १० ग्रॅम ९७,८०० रुपयांवर बंद झाला होता.

सुरक्षित मालमत्तेची मागणी आणि पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपात पुन्हा होईल. या वाढत्या एकमतामुळे मंगळवारी सोन्याच्या किमती वाढल्या.

सराफा असोसिएशनच्या मते, मंगळवारी चांदीच्या किमती २००० रुपयांनी वाढून १,१२,००० रुपये प्रति किलोग्रॅम (सर्व करांसह) झाल्या. मागील बाजार सत्रात चांदीचा भाव १,१०,००० रुपये प्रति किलोग्रॅम होता.

जूनमध्ये अमेरिकन कारखान्यांच्या ऑर्डरमध्ये घट झाल्यामुळे स्पॉट गोल्ड सोमवारी सुमारे ०.३० टक्क्यांनी वाढून ३,३७५ डॉलर प्रति औंसवर बंद झाला. दरम्यान, न्यूयॉर्कमध्ये स्पॉट सोन्याचा भाव २०.९५ डॉलर किंवा ०.६२ टक्क्यांनी घसरून ३,३५२.६१ डॉलर प्रति औंस झाला.

सोन्याचा भाव ३,४३० डॉलर प्रति औंसच्या जवळ स्थिर आहे, असे कोटक सिक्युरिटीजमधील कमोडिटी रिसर्चच्या एव्हीपी कायनात चैनवाला यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर, स्पॉट चांदीचा भाव ३७.३९ डॉलर प्रति औंसवर स्थिर होता.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय : सर्व स्मार्टफोनमध्ये ‘संचार साथी’ ॲप अनिवार्य; सायबर फसवणुकीवर लगाम

"काँटनेवाले अंदर बैठे हैं"; संसदेत श्वान आणणाऱ्या खासदार रेणुका चौधरींचा सरकारवर निशाणा, भाजपकडून कारवाईची मागणी

मुंबईत पुन्हा हाय अलर्ट! २ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर

ठाणे ते दक्षिण मुंबई अवघ्या ३० मिनिटांत! MMRDA कडून एलिव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे एक्स्टेंशनच्या कामाला सुरुवात

'उतावीळ लोकं, उतावीळ कामं'! समांथाने राज निदिमोरूशी 'गुपचूप' केलं लग्न; दिग्दर्शकाच्या पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत