बिझनेस

कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण; जनतेला पेट्रोल, डिझेल कधी स्वस्त मिळणार?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात ३ वर्षांनंतर मोठी घसरण झाली आहे. ६ मार्च रोजी कच्च्या तेलाचे दर पहिल्यांदा ७० डॉलरपेक्षा कमी झाले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात ३ वर्षांनंतर मोठी घसरण झाली आहे. ६ मार्च रोजी कच्च्या तेलाचे दर पहिल्यांदा ७० डॉलरपेक्षा कमी झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झालेली नाही. आता तरी भारतातील पेट्रोल-डिझेल दर स्वस्त होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचे पिंप ६९.७६ डॉलर, तर डब्ल्यूटीआय क्रूडचे पिंप ६६.७७ डॉलर प्रति पिंप झाले. तरी सरकारी तेल कंपन्यांनी आपल्या पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही कपात केली नाही.

कच्चे तेल स्वस्त झाल्याने एशियन पेंट्स, बीपीसीएल, एचपीसीएल, अपोलो टायर्स आदींच्या समभागात ३.५ ते ४ टक्के वाढ झाली. कच्च्या तेलाचे दर घटल्याने तेल विपणन कंपन्यांच्या नफ्यात वाढ होऊ शकते. तसेच पेंट व टायर कंपन्यांच्या कच्च्या मालाच्या दरात कपात झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांची या कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढवण्याची चढाओढ सुरू झाली आहे.

ब्रेंट तेलाच्या दरात डॉलरच्या दरात प्रति पिंप ७० डॉलरपेक्षा कमी झाल्या आहेत. गेल्या चार दिवसात कच्च्या तेलाच्या दरात ६ टक्क्याने घट झाली. २०२१ नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाचा दर कमी झाला आहे.

मॉर्गन स्टॅनलेने सांगितले की, २०२५ च्या दुसऱ्या सहामाहीत तेलाचे दर ६० डॉलर्स प्रति पिंपाच्या आसपास राहतील.

कच्च्या तेलाचा वापर अनेक क्षेत्राच्या कच्च्या मालासाठी होतो. त्यामुळे कच्च्या तेलाच्या घटत्या किमती या क्षेत्रासाठी वरदान ठरतील. तेल शुद्धीकरण कंपन्यांचा खर्च कमी होईल. त्यामुळे नफा वाढणार आहे. त्यामुळे चेन्नई पेट्रो, इंडियन ऑयल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम आदींच्या समभागात १० टक्के वाढ झाली आहे.

कच्च्या तेलाचा किमतीचा मोठा परिणाम रंग उद्योगावर होतो. रंग बनवायला ३०० हून अधिक वस्तू लागतात. त्यात बहुतांशी पेट्रोलियम उत्पादने असतात. रंग कंपन्यांचा कच्च्या मालाचा हिस्सा ५५ ते ६० टक्के असतो. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उताराचा फटका कंपन्यांच्या नफ्यावर होतो.

बर्जर पेंट्स, कानसाई नेरोलॅक आणि एशियन पेंट्स आदी कंपन्यांचे समभाग २ ते ४ टक्क्याने वाढले.

टायर कंपन्यांना फायदा

सिंथेटिक रबर व टायर बनवणाऱ्या प्रक्रियेत पेट्रोलियम उत्पादनांचा वापर होतो. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यास कच्च्या मालाचा खर्च कमी होतो. त्यामुळे टायर कंपन्यांचा उत्पादन खर्च कमी होतो.

तेलाचे दर का घसरले?

ब्रेंट क्रूडचे दर घटण्यामागे ‘ओपेक प्लस’ संघटनेने जाहीर केले की, उत्पादन कपात हळूहळू कमी करण्याची योजना बनवली आहे. येत्या दोन वर्षांत रोज २.२ दशलक्ष कच्चे तेल बाजारात आणले जाणार आहे.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या