संग्रहित छायाचित्र (FPJ - PTI)
बिझनेस

अमेरिकेतील व्यापार चर्चेत भारत सरकार देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करेल; कृषी मंत्री शिवराज सिंह यांना विश्वास

कृषी बाजारपेठेतील प्रवेशाबाबत अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापार वाटाघाटींमध्ये संभाव्य नफा आणि तोटा यांचे मूल्यांकन करताना भारत शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यास प्राधान्य देईल, असे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले.

Swapnil S

नवी दिल्ली : कृषी बाजारपेठेतील प्रवेशाबाबत अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापार वाटाघाटींमध्ये संभाव्य नफा आणि तोटा यांचे मूल्यांकन करताना भारत शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यास प्राधान्य देईल, असे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले.

आमच्या शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे हे आमचे प्राधान्य आहे. भारत डोळे बंद करून काम करणार नाही. आम्ही आमचे नफा आणि तोटा यांचे मूल्यांकन करू. हे लक्षात घेऊन, एक करार अंतिम केला जाईल, असे चौहान यांनी पीटीआयला मुलाखतीत सांगितले.

अमेरिकेच्या कृषी आणि बागायती उत्पादनांना अधिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अमेरिकेच्या दबावादरम्यान भारत शेतकऱ्यांचे रक्षण कसे करेल? या प्रश्नाचे उत्तर देताना ते बोलत होते.

द्विपक्षीय कराराच्या पहिल्या टप्प्यातील व्यापक आराखड्यावर उभय देश सहमत होऊन सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ पर्यंत या करारावर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरू आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे की, आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करू. जेव्हा आपण दोन राष्ट्रांबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला एकूण व्यापार पाहण्याची आवश्यकता असते, असे मंत्री पुढे म्हणाले.

Sydney Mass Shooting: सिडनीतील बॉन्डी बीचवर भीषण गोळीबार; १० जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

अमेरिकेच्या रोड आयलंडमधील ब्राउन विद्यापीठात गोळीबार; २ जणांचा मृत्यू, संशयिताचा शोध सुरू

अजित पवारांनी हेडगेवार स्मृतीस्थळाची भेट टाळली, आनंद परांजपेंचे स्पष्टीकरण; म्हणाले...

सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात; नवी मुंबईतील १७ हजार घरांची लॉटरी लवकरच

BMC Election : मुंबई मनपा निवडणुकीची उद्या घोषणा?