बिझनेस

जपानच्या तुलनेत भारताचे दरडोई उत्पन्न अजूनही कमी; भारताच्या चौथ्या अर्थव्यवस्थेकडील वाटचालीवर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माजी एमडींचा दावा

भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे, परंतु दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारत देश जपानपेक्षा खूप मागे आहे, असे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे माजी एमडी क्लॉड स्मॅडजा म्हणाले.

Swapnil S

नवी दिल्ली : भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे, परंतु दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारत देश जपानपेक्षा खूप मागे आहे, असे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे माजी एमडी क्लॉड स्मॅडजा म्हणाले.

एप्रिल २०२५ च्या आयएमएफच्या आकडेवारीनुसार, भारताचा दरडोई उत्पन्न २,८७८.४ अमेरिकन डॉलर आहे जो जपानच्या दरडोई उत्पन्न ३३,९५५.७ अमेरिकन डॉलरच्या अंदाजे ८.५ टक्के आहे, म्हणजेच जपानचे दरडोई उत्पन्न भारतापेक्षा सुमारे ११.८ पट जास्त आहे.

हो, तो (अर्थव्यवस्थेचा आकार) एक चांगला निर्देशक आहे कारण तो जागतिक समतोलावर देशाच्या आर्थिकवाढीची कल्पना देतो. तथापि, तो चांगला निर्देशक नाही कारण दरडोई उत्पन्न महत्त्वाचा आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत, भारत जपानपेक्षा खूपच खाली आहे. त्यामुळे जागतिक आर्थिक संतुलनात भारताने हे चौथे स्थान मिळवले आहे का... हे प्रगती होत असल्याचे एक चांगले सूचक आहे, परंतु ते कोणत्याही प्रकारे आत्मसंतुष्ट होण्याचे कारण नाही, असे स्मदजा यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video