बिझनेस

‘हिंडेनबर्ग रिसर्च’ला ‘कारणे दाखवा’ नोटीस; सेबीची कारवाई

सेबीने अमेरिकन आर्थिक संशोधन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चला ४६ पानांचीनोटीस बजावली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : सेबीने अमेरिकन आर्थिक संशोधन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चला ४६ पानांचीनोटीस बजावली आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी ग्रुपवर स्टॉक मॅनिप्युलेशनपासून मनी लाँड्रिंगपर्यंतचे आरोप केले होते, त्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे.

सेबीकडून नोटीस मिळाल्याची माहिती हिंडेनबर्ग यांनी दिली आहे. मात्र, हिंडेनबर्ग यांनी या नोटिशीवर नाराजी व्यक्त केली असून भ्रष्टाचार आणि फसवणूक उघड करणाऱ्यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे.

हिंडेनबर्गने सांगितले की, त्यांना २७ जून रोजी सेबीकडून ईमेल प्राप्त झाला आणि नंतर भारतीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘कारणे दाखवा’ नोटीस मिळाली. तथापि, हिंडेनबर्ग म्हणाले की, ‘आजपर्यंत अदानी समूह आमच्या अहवालांमध्ये केलेल्या आरोपांना उत्तर देण्यात अयशस्वी ठरला आहे. दिलेल्या उत्तराने आम्ही उपस्थित केलेल्या प्रमुख मुद्द्याकडे दुर्लक्ष केले आहे. हिंडेनबर्गच्या जानेवारी २०२३ च्या अहवालात आरोप आहे की, गौतम अदानी आणि त्यांचे भाऊ विनोद अदानी आणि जवळचे सहकारी यांनी ‘शेल’ कंपन्यांचे मजबूत नेटवर्क तयार केले होते. या शेल कंपन्यांच्या माध्यमातून अब्जावधी डॉलरचा घोटाळा कसा झाला हे आम्ही तपशीलवार सांगितले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटले आहे की, ते माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दाखल करणार असून, अदानी आणि हिंडेनबर्ग प्रकरणात काम करणाऱ्या सेबी कर्मचाऱ्यांची नावे मागवणार आहेत. हिंडेनबर्गने सेबी आणि अदानी आणि त्यांचे विविध प्रतिनिधी यांच्यातील बैठकी आणि कॉलचे तपशीलही मागवले आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी