बिझनेस

एअरटेल-स्पेसएक्स उपग्रह इंटरनेट सेवा देणार

भारतात लवकरच उपग्रहावरून इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. यासाठी भारती एअरटेल व एलॉन मस्क यांची कंपनी ‘स्पेसएक्स’मध्ये करार झाला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतात लवकरच उपग्रहावरून इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. यासाठी भारती एअरटेल व एलॉन मस्क यांची कंपनी ‘स्पेसएक्स’मध्ये करार झाला आहे. या करारांतर्गत स्पेसएक्स व एअरटेल उद्योग, शिक्षण संस्था, आरोग्य केंद्र, दुर्गम भाग आदी ठिकाणी स्टारलिंक सेवा देण्यासाठी एकत्रितपणे काम करणार आहेत. एअरटेलच्या सध्याच्या नेटवर्कमध्ये स्टारलिंक तंत्रज्ञान सामावून घेण्याची शक्यता पाहिली जाईल.

स्टारलिंक ही जगात सर्व वापरकर्त्यांना वेगवान इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी आहे. या कंपनीकडे ७ हजारांहून अधिक उपग्रहांचे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. स्टारलिंक इंटरनेटच्या सहाय्याने स्ट्रीमिंग, ऑनलाइन गेमिंग, व्हिडीओ कॉलिंग आरामात करता येते. दुर्गम भाग उपग्रहाच्या सहाय्याने वेगवान इंटरनेटने जोडले जाऊ शकतात. कंपनीतर्फे एक किट पुरवले जाते. त्यात राऊटर, केबल, माऊंटिंग ड्रायपॉड दिले जाते. हायस्पीड इंटरनेटसाठी डिशला मोकळ्या जागेत ठेवले जाते.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार