गुंतवणूक टिप्स  प्रातिनिधिक फोटो
बिझनेस

'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, करोडपती झालाच म्हणून समजा..

Suraj Sakunde

मुंबई : अलीकडच्या काळात गुंतवणूकीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. परंतु नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये (NPS) गुंतवणुक खूप फायद्याची ठरते. इतर गुंतवणूक योजनांच्या तुलनेत या योजनेत चांगला परतावा मिळतो. तुम्ही या योजनेत जेवढी लवकर गुंतवणूक करण्यास सुरुवात कराल, तर सेवानिवृत्तीपर्यंत तुम्ही प्रचंड निधी जमा करू शकता आणि तुमचे भावी आयुष्य पैशाची चिंता न करता जाऊ शकते. ही एक पेन्शन योजना आहे, त्यामुळे तुम्हाला ठेव रकमेचा एक भाग एकरकमी मिळेल तर काही भाग अॅन्युइटीसाठी खरेदी करावा लागेल. तुम्ही पेन्शनप्रमाणे अॅन्युइटी पाहू शकता.

मॅच्युरिटीनंतरही फायदे-

नॅशनल पेमेंट सिस्टममध्ये, तुम्हाला मॅच्युरिटीनंतर 2 फायदे मिळतात. तुमच्या निधीपैकी 60 टक्के रक्कम तुम्ही घरी घेऊन जाता. दुसऱ्या भागासह म्हणजे 40 टक्के रकमेसह, तुम्हाला वार्षिकी खरेदी करावी लागेल. तुम्हाला ही रक्कम दर महिना, 3 महिने, 6 महिने किंवा वार्षिक आधारावर मिळते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती निवृत्तीनंतरही चांगली राहते. एनपीएस ही मार्केट लिंक्ड स्कीम आहे, त्यामुळे मार्केटशी संबंधित जोखीमही त्यात असते. त्यामुळं गुंतवणूक करण्यापूर्वी हे नक्की लक्षात ठेवा. हे

काही वर्षांतच व्हाल करोडपती-

तुम्ही 28 वर्षांचे असाल आणि NPS मध्ये दरमहा 10 रुपये गुंतवले आणि वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत हे काम करत असाल, तर तुमच्याद्वारे जमा केलेली एकूण रक्कम 38 लाख 40 हजार रुपये होईल. यावरील परतावा खूप चांगला आहे, परंतु काहीवेळा नकारात्मक परतावाही होऊ शकतो. त्यामुळं सरासरी परतावा 10 टक्के गृहीत धरला तरी NPS मध्ये जमा केलेली एकूण रक्कम 2.80 कोटी रुपये होईल.. यामध्ये तुम्हाला 60 टक्के रक्कम म्हणजेच 1.6 कोटी रुपये एकरकमी मिळतील तर तुम्हाला दरमहा 75 हजार रुपये पेन्शनही मिळेल.

अलीकडच्या काळात नकारात्मक परतावा, पण-

Kfintech चे MD आणि CEO सत्या नडेला लिहितात की, गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंड ज्या प्रकारे नकारात्मक परतावा देत आहेत, जवळपास तीच परिस्थिती NPS ची झाली आहे. मात्र, यापासून गुंतवणूकदारांना घाबरण्याची गरज नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. लोकांनी एनपीएसकडे एसआयपीप्रमाणेच पाहावे, असे त्यांचं मत आहे. नडेला यांच्या मते, अलीकडच्या काळात MF च्या परताव्यात घट होण्याचं मुख्य कारण म्हणजे लार्ज कॅप स्टॉक्सकडे झुकणारा बाजार. ते म्हणाले की जेव्हा जेव्हा बाजारात हे घडते तेव्हा इक्विटीशी संबंधित योजना कमी होतात. लोकांनी घाबरून न जाता एनपीएसमध्ये गुंतवणूक करत राहावे कारण ही गुंतवणूक भविष्यात खूप फायदेशीर ठरू शकते.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त