नवी दिल्ली : अमेरिकन फेडरल रिझर्व्हचा व्याजदराच्या होणाऱ्या निर्णयावर या आठवड्यात देशांतर्गत शेअर बाजाराची दिशा ठरेल. कारण अमेरिकेच्या निर्णयावर विदेशी गुंतवणूकदारांची भूमिका ठरेल, असे विश्लेषकांनी सांगितले.
या आठवड्यात यूएस फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये व्याजदर कपातीची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास जगभरात अनेक देशांमध्ये व्याजदर कपातीला सुरुवात होईल. जरी काही तज्ज्ञांनी ५० बीपीएस व्याजदर कपातीचा अंदाज व्यक्त केला असला तरी अमेरिकेत २५ बेसिस पॉइंट्स (बीपीएस) व्याजदर कपात होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे पाऊल जागतिक बाजारपेठांसाठी, विशेषत: भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांसाठी एक महत्त्वपूर्ण सकारात्मक बाब ठरेल. कारण त्याचा परिणाम डॉलर कमकुवत होईल आणि यूएस उत्पन्न कमी होईल आणि भारतीय इक्विटीमध्ये परकीय चलन वाढेल, असे संतोष मीणा, संशोधन प्रमुख, स्वस्तिक इन्व्हेस्टमार्ट लि. म्हणाले.
याव्यतिरिक्त, जपानच्या चलनवाढीचा डेटा शुक्रवारी जाहीर होणार आहे, त्यानंतर बँक ऑफ जपानच्या चलनविषयक पतधोरण जाहीर करेल.
भारतातील घाऊक महागाई दर, यूएस औद्योगिक उत्पादन, यूएस फेड व्याजदर निर्णय, यूएस FOMC आर्थिक अंदाज आणि यूएस प्रारंभिक बेरोजगार दावे यासारख्या प्रमुख देशांतर्गत आणि जागतिक आर्थिक डेटाद्वारे बाजाराचा दृष्टिकोन निर्देशित केला जाईल, असे पल्का अरोरा चोप्रा, संचालक, मास्टर कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड, म्हणाले.