मुंबई : ग्राहकांच्या वर्तनाला चालना देणारे प्रमुख कल आघाडीच्या शोध व्यासपीठ जस्ट डायलने मावळत्या वर्षात जारी केले आहेत.
भारतातील लोकप्रिय स्थानिक सर्च इंजिनने भारतीयांनी काय शोधले याचा समावेश असलेल्या एका सर्वसमावेशक अहवालाचे नुकतेच अनावरण केले. यातून भारतीयांच्या वैविध्यपूर्ण आणि सातत्याने विकसित होत असलेली सवय दिसून आली.
भारतीयांनी आरोग्यसेवा, तंदुरुस्ती, प्रवास, अन्न आणि शिक्षण यांसारख्या श्रेणींमधील आकर्षक कल दाखवला. तर आरोग्य, सुविधा यावरही अधिकाधिक लोकांचे लक्ष असल्याचे दिसून आले आहे. सर्च ट्रेंडमध्ये टियर १ आणि टियर २ शहरांमधील फरकही समोर आला आहे. टियर २ शोधांनी टियर १ शहरांपेक्षा ११२% अधिक सर्चिंग केले आहे. यामुळे डिजिटल दुनियेचा विस्तार केवळ महानगरापुरताच मर्यादित नसल्याचे सिद्ध झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
विश्लेषणानुसार आरोग्यसेवा, सुखासीन जगणे, शिक्षण आणि ब्रेक अशा विशिष्ट श्रेणींना शहरी आणि निमशहरी भागात सारखेच महत्त्व आहे. प्राधान्यक्रम आणि त्याकडे जाण्याचे मार्ग मात्र भिन्न असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सेवा श्रेणीने या सर्चमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २४% वाढ नोंदवली आहे. यामुळे सर्वाधिक शोधल्या गेलेल्या क्षेत्रांपैकी एक म्हणून त्याचे स्थान भक्कम झाले आहे. तसेच ईएनटी तज्ज्ञ (२१%) आणि दंतचिकित्सकांसाठीचा (१९%) सर्च विशेष वैद्यकीय सेवेवर अधिक लक्ष केंद्रित असल्याचे सांगतात. रुग्णालये आणि निदान केंद्रांच्या सर्चिंगमध्ये वाढ दिसली आहे. शहरी आणि ग्रामीण भारतातील ग्राहकांद्वारे सुलभ आरोग्य सेवा उपायांना ते प्राधान्य देत आहे.
भारतीयांच्या निरोगीपणा आणि वैयक्तिक काळजीच्या सर्चिंगमध्ये वार्षिक ७% वाढ झाली आहे. रिलॅक्सेशन थेरपी, ब्युटी स्पा, ब्युटी पार्लर, सलून आणि स्किनकेअर क्लिनिक्सच्या सर्चिंगमध्ये दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आणि चेन्नईने आघाडी घेतली. स्किनकेअर हे १५% वार्षिक वाढीसह एक प्रमुख क्षेत्र म्हणून उदयास आले आहे.
शाळा, महाविद्यालये आणि ग्रंथालयांसाठीच्या सर्वाधिक सर्चिंगसह शिक्षण हा वर्षभर केंद्रबिंदू राहिला. हे भारताचा पायाभूत आणि उच्च शिक्षणावर सतत भर देत असल्याचे दिसून येते. पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन हे ट्रेंड कौशल्य-बांधणी आणि छंदांमध्ये स्वारस्य दाखवते. नृत्य, क्रिकेट, संगीत आणि टेलरिंग क्लास यांसारख्या गोष्टींसाठीचे शोध वेगळे आहेत.
रिअल इस्टेट एजंट (१०% वाढ) आणि वाहतूकदारांसाठीच्या वाढत्या सर्चिंगमुळे गृहनिर्माण आणि प्रवासी उपायांचे महत्त्व अधोरेखित होते आहे.