बिझनेस

OMG! फक्त 1 लाख 29 हजार रुपयांमध्ये घरी आणा 69 लाख रुपयांची आलिशान कार, KIA ने आणली खतरनाक ऑफर

Suraj Sakunde

किआ मोटर्सकडून (Kia Motors) ग्राहकांना खूशखबर देण्यात आलीये. नवीन कार्सच्या विक्री व्यतिरिक्त किआ इंडिया भाडेतत्वावर कार देत आहे. अशा परिस्थितीत तुमचे बजेट कमी असले तरी तुम्ही लक्झरी कारचा आनंद घेऊ शकता. यासाठी तुम्हाला मासिक भाड्याने कार मिळेल. अलीकडेच कंपनीने Kia EV6 इलेक्ट्रिक कारसाठी रेंटल पॉलिसी आणली आहे.

होय, आता तुम्ही Kia EV6 मध्ये फक्त 1.29 लाख रुपये मासिक भाडे देऊन प्रवास करू शकता. या भाड्यात इन्शुरन्स, मेंटेनन्स, पिक-अप/ड्रॉप, 24×7 रोड साइड असिस्टन्स सेवा यांचा समावेश आहे. याचा अर्थ तुम्ही एवढे पैसे देऊन कार आरामात वापरू शकता.

याशिवाय, तुम्ही Kia Sonet प्रति महिना 17,999 रुपये, Kia Seltos 23,999 रुपये प्रति महिना आणि Kia Carens 24,999 रुपये प्रति महिना देऊन भाड्याने घेऊ शकता.

Kia EV6 लीजवर घेण्यासाठी आवश्यक पात्रता: कंपनीच्या मते, फक्त चार विभागातील लोक Kia EV6 लीजवर घेऊ शकतात. यामध्ये मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (MCI) मध्ये नोंदणीकृत डॉक्टर आणि ICAI मध्ये नोंदणीकृत चार्टर्ड अकाउंटंट्सचा समावेश आहे.

याशिवाय ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि जे कोणत्याही कॉर्पोरेट कंपनीत काम करणारे कर्मचारी आहेत, ते देखील ही कार खरेदी करू शकतात. एकूणच, आता तुम्ही परवडणाऱ्या किमतीत लक्झरी कारचा आनंद घेऊ शकता.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था