गुंतवणूक टिप्स  प्रातिनिधिक फोटो
बिझनेस

५ लाख गुंतवा अन् १० लाख मिळवा, पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम माहीत आहे का?

Post Office Scheme: या योजनेत गुंतवणूक केल्याने, पैसे काही महिन्यांत दुप्पट होतात.

Suraj Sakunde

अलीकडच्या काळात गुंतवणूकीचं महत्त्व लोकांना कळू लागलं आहे. पैसे कमावण्याएवढंच पैसे वाचवणं महत्त्वाचं आहे आणि वाचवलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवणंदेखील तितकंच गरजेचं आहे, हे लोकांना समजू लागलंय. तुम्हीदेखील गुंतवणूकीसाठी सुरक्षित पर्यायाच्या शोधात असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसकडून अनेक सरकारी योजना ऑफर केल्या जातात, ज्यामुळे लोकांना काही काळानंतर चांगला नफा मिळतो. शेअर बाजार किंवा इतर ठिकाणांच्या तुलनेत पोस्ट ऑफिस योजनांमध्ये धोका नगण्य आहे. जर तुम्हालाही जोखीम न घेता जास्त पैसे कमवायचे असतील, तर आज आम्ही तुम्हाला अशा योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे गुंतवलेले पैसे दुप्पट होतील.

पोस्ट ऑफिसची ही लोकप्रिय योजना किसान विकास पत्र (KVP) आहे. विशेषत: अधिक नफा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेत गुंतवणूक केल्यास पैसे काही महिन्यांत दुप्पट होतात. या योजनेत, तुम्ही १०० च्या पटीत किमान १००० रुपये गुंतवू शकता. विशेष म्हणजे यामध्ये कमाल मर्यादा नाही. तुम्हाला हवे तितके पैसे तुम्ही गुंतवू शकता.

तुम्ही किती खाती उघडू शकता?

किसान विकास पत्र योजनेअंतर्गत सिंगल आणि डबल खाती उघडता येतात. १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाच्या नावानंही खाते उघडता येते. तसेच, एखादी व्यक्ती कितीही खाती उघडू शकते. यालाही मर्यादा नाही. तुम्ही किसान विकास पत्र योजनेअंतर्गत तुम्हाला हवी तेवढी खाती उघडू शकता.

७.५ टक्के व्याज-

पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत, व्याज तिमाही आधारावर ठरवले जाते. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत सध्या ७.५ टक्के व्याज दिले जात आहे. हे व्याज वार्षिक आधारावर जारी केले जाते.

५ लाख रुपये गुंतवून १० लाख रुपये मिळवा-

जर कोणी या योजनेत ५ लाख रुपये गुंतवले आणि मॅच्युरिटीपर्यंत म्हणजेच ११५ महिने या योजनेत राहिल्यास, त्याला केवळ ७.५ टक्के व्याजाच्या आधारे ५ लाख रुपये मिळतील. याचा अर्थ गुंतवणूकदारांना मुदतपूर्तीवर १० लाख रुपये मिळतील.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत