बिझनेस

१० लाखांवरील लक्झरी वस्तूंवर १ टक्का टीसीएस; आयकर विभागाचा निर्णय, २२ एप्रिलपासून अंमलबजावणी

नवी दिल्ली : दहा लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हँडबॅग्ज, मनगटी घड्याळ, पादत्राणे आणि स्पोर्ट्सवेअर यांसारख्या लक्झरी वस्तूंवर आता स्त्रोतावर १ टक्के ‘टॅक्स कलेक्टेड ॲट सोअर्स (टीसीएस) वसूल केला जाईल.

Swapnil S

नवी दिल्ली : दहा लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हँडबॅग्ज, मनगटी घड्याळ, पादत्राणे आणि स्पोर्ट्सवेअर यांसारख्या लक्झरी वस्तूंवर आता स्त्रोतावर १ टक्के ‘टॅक्स कलेक्टेड ॲट सोअर्स (टीसीएस) वसूल केला जाईल.

आयकर विभागाने निश्चित केलेल्या १० लाख रुपयांपेक्षा जास्त विक्रीची किंमत असलेल्या लक्झरी वस्तूंच्या विक्रीवर १ टक्के दराने ‘टीसीएस’ लागू करण्याबाबत अधिसूचित केले आहे. यासंदर्भातील अमलबजावणी २२ एप्रिल २०२५ पासून करण्यात येणार आहे.

जुलै २०२४ मध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाचा भाग म्हणून लक्झरी वस्तूंसाठी ‘टीसीएस’ तरतूद वित्त कायदा, २०२४ द्वारे सादर करण्यात आली.

टीसीएस गोळा करण्याचे बंधन विक्रेत्यावर अधिसूचित वस्तू जसे की मनगटाचे घड्याळ, कला वस्तू जसे की पेंटिंग, शिल्पे आणि पुरातन वस्तू, नाणी आणि शिक्के, यॉट, हेलिकॉप्टर, लक्झरी हँडबॅग, सनग्लासेस, पादत्राणे, उच्च श्रेणीचे स्पोर्ट्सवेअर आणि होम थिएटर सिस्टीम आणि शर्यत किंवा पोलोसाठी वापरण्याच्या हेतूने घोडे आदीं संदर्भात असेल.

नांगिया अँडरसन एलएलपी कर भागीदार संदीप झुनझुनवाला म्हणाले की, ही अधिसूचना उच्च-मूल्याच्या वस्तुंच्या खर्चावर देखरेख वाढवण्याच्या आणि लक्झरी वस्तूंच्या विभागातील ऑडिट मजबूत करण्याच्या सरकारच्या हेतूला कार्यान्वित करते. हे कर कक्षेचा विस्तार आणि अधिक आर्थिक पारदर्शकतेला चालना देण्याचे व्यापक धोरण उद्दिष्ट प्रतिबिंबित करते.

विक्रेत्यांना आता टीसीएस तरतुदींचे वेळेवर पालन सुनिश्चित करणे आवश्यक असेल, तर अधिसूचित लक्झरी वस्तूंच्या खरेदीदारांना खरेदीच्या वेळी वर्धित केवायसी आवश्यकता आणि कागदपत्रे अनुभवता येतील.

झुनझुनवाला पुढे म्हणाले, जरी लक्झरी वस्तू क्षेत्राला काही संक्रमणकालीन आव्हानांना सामोरे जावे लागत असले तरी, या उपायामुळे औपचारिकीकरण आणि सुधारित नियामक निरीक्षणाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Mumbai : मुंबई पोलिसांची फटाक्यांवर कडक नियमावली; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

पेंग्विनची भुरळ कायम! राणीच्या बागेला तीन वर्षांत ३५.३६ कोटींचा महसूल

भटक्या श्वान-मांजरींसाठी १२ कोटींचा खर्च अपेक्षित; नसबंदी, रेबीज लसीकरण मोहीम राबविणार

दिवाळी हंगामात विमान भाडे ३०० टक्क्यांनी वाढले

देशातील न्यायालयात आठ लाख अंमलबजावणी आदेश प्रलंबित; सर्वोच्च न्यायालयाची माहिती