बिझनेस

लक्झरी आणि पॉवरचे कॉकटेल ! 17Kmpl मायलेज, 7 जण करू शकतात प्रवास, 'ही' SUV आहे खास

जर तुम्ही SUV शोधत असाल, जी पॉवर आणि लक्झरीचा कॉम्बो आहे, तर तुम्ही Mahindra XUV700 चा विचार करू शकता.

Suraj Sakunde

महिंद्रा ही देशांतर्गत बाजारपेठेतील सर्वात विश्वासार्ह ऑटोमोबाईल उत्पादक मानली जाते. विशेषत: महिंद्राच्या एसयूव्ही बाजारात धुमाकूळ घालत आहेत. कंपनीच्या लाइनअपमध्ये अनेक शक्तिशाली SUV आहेत. यामध्ये बोलेरो, स्कॉर्पिओ आणि XUV700 सारख्या लोकप्रिय SUV चा देखील समावेश आहे. शहरांव्यतिरिक्त गावांमध्येही या तिन्ही एसयूव्ही सुपरहिट आहेत.

जर तुम्ही SUV शोधत असाल, जी पॉवर आणि लक्झरीचा कॉम्बो आहे, तर तुम्ही Mahindra XUV700 चा विचार करू शकता. ही 7-सीटर एसयूव्ही कुटुंबासाठी सर्वोत्तम आहे. सेफ्टी फीचर्स व्यतिरिक्त हीचे मायलेज देखील चांगले आहे.

किती आहे किंमत?:

Mahindra XUV700 SUV देशांतर्गत बाजारात परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे. तिची किंमत 13.99 लाख रुपये ते 26.04 लाख रुपये एक्स-शोरूम दरम्यान आहे. यात MX, AX, AX3, AX5 यासह विविध व्हेरियंट आहेत.

कलर आणि सीटिंग ऑप्शन: Mahindra XUV700 एव्हरेस्ट व्हाइट, मिडनाईट ब्लॅक, नेपोली ब्लॅक यासह अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे. व्हेरियंटनुसार 5, 6 किंवा 7 सीटरचा पर्याय आहे. शनिवार व रविवार आणि सुट्टीच्या दिवशी अधिक सामान नेण्यासाठी 240-लिटर बूट स्पेस उपलब्ध आहे.

परफॉर्मन्स कसा आहे? :

महिंद्रा XUV700 SUV 2 पॉवरट्रेनसह उपलब्ध आहे. तिचे 2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन 200 PS कमाल पॉवर आणि 380 Nm पीक टॉर्क निर्माण करते. तर दुसरे 2.2-लिटर डिझेल इंजिन 185 PS पॉवर आणि 450 Nm पीक टॉर्क निर्माण करते.

व्हेरियंटनुसार, या एसयूव्हीमध्ये 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. तसेच FWD (फ्रंट व्हील ड्राइव्ह) आणि AWD (ऑल व्हील ड्राइव्ह) तंत्रज्ञानाचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच, महिंद्रा XUV700 प्रति लिटर सुमारे 17 किमी मायलेज देते.

फीचर्स:

Mahindra XUV700 SUV मध्ये अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत. 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 6-वे पॉवर ड्रायव्हर सीट, 12-स्पीकर ऑडिओ सिस्टम, सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, बिल्ट-इन अलेक्सा कनेक्टिव्हिटी आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यांसारखी फीचर्स आहेत.

सेफ्टी फीचर्स:

ही कार प्रवाशांना जास्तीत जास्त सुरक्षितता प्रदान करते. Mahindra XUV700 मध्ये 7 एअरबॅग (इलेक्ट्रिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम), टीपीएमएस (टायर प्रेशर मॉनेटरिंग सिस्टम), एडीएएस (एडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) आणि एक 360 डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे.

भारतीय बाजारपेठेत, Mahindra XUV700 ची स्पर्धा Hyundai Alcazar, Tata Harrier, Hyundai Creta, MG Hector Plus आणि Tata Safari सारख्या आघाडीच्या SUV सोबत आहे. एकंदरीत, लांब टूर करणाऱ्या लोकांसाठी ही एसयूव्ही एक चांगला पर्याय आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले