बिझनेस

बड्या उद्योगसमूहांची नाशिकमध्ये गुंतवणूक; मोठ्या गुंतवणूक घोषणांनी अर्थकारणाला मिळणार बळकटी

नाशिक शहर आणि परिघातील औद्योगिक क्षेत्रांत विविध समूहांच्या वतीने मोठी गुंतवणूक करून प्रकल्प उभारण्याची झालेली घोषणा नाशिकचे महत्व अधोरेखित करणारी आहे. तसेच नाशिकला विकासाच्या नव्या क्षितिजाकडे नेणारी असल्याची प्रतिक्रिया उद्योग वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Swapnil S

नाशिक : नाशिक शहर आणि परिघातील औद्योगिक क्षेत्रांत विविध समूहांच्या वतीने मोठी गुंतवणूक करून प्रकल्प उभारण्याची झालेली घोषणा नाशिकचे महत्व अधोरेखित करणारी आहे. तसेच नाशिकला विकासाच्या नव्या क्षितिजाकडे नेणारी असल्याची प्रतिक्रिया उद्योग वर्तुळातून व्यक्त होत आहे.

समूहांच्या निर्णयामुळे इतर मोठी गुंतवणूक नाशिकमध्ये येण्यास पूरक वातावरण तयार होईल, असा विश्वासदेखील यानिमित्त व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांत नाशिकसह इगतपुरी आणि दिंडोरी औद्योगिक वसाहतीत वेगवेगळ्या उद्योग समूहांनी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये महिंद्रा आणि महिंद्रा, ग्राफाईट इंडिया लिमिटेड, एपिरोक एबी, व्हर्च्युओसो आदी बड्या समूहांचा समावेश आहे. यामधून होणाऱ्या प्रकल्पांमुळे नाशिक औद्योगिक परिसराचे अर्थकारण बदलणार आहेच, शिवाय मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माणाचे गणित साधले जाणार आहे. विशेषतः, स्थानिकांना रोजगार निर्माण होण्याची शक्यता बळावणार आहे. गेल्या अनेक वर्षांत इथे कोणताही बडा प्रकल्प न आल्याची खंत व्यक्त होत होती. नव्या समीकरणातून या चर्चा आता बंद होतील. याशिवाय, केंद्र आणि राज्यात एकाच विचारसरणीचे सरकार असल्याने नवी गुंतवणूक येण्यातील अडचणींचा उहापोह देखील यानिमित्त थांबेल, असा आशावाददेखील व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिकची ओळखच उद्यमनगरी म्हणून अनेक दशकांपासून आहे. स्वाभाविकच इथे पाय रोवण्यासाठी अनेक बडे उद्योग समूह उत्सुक असतात. मेगा प्रकल्प आणणे, सेन्ट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटची उभारणी, प्रदर्शन केंद्र उभारणी, ड्रायपोर्टला चालना देणे आणि डिफेन्स हब निर्माण ही 'निमा'ची पंचसूत्री अनेक समूहांना भावली आहे. यामधील तीन प्रकल्प निर्मांच्या उंबरठ्यावर आहेत. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वॉररूम’च्या संपर्कात आहोत. नाशिकमध्ये अजून मोठ्या समूहांची गुंतवणूक येणार असल्याचे संकेत आहेत. नव्या उद्योगांचे स्वागत आहे.
आशिष नहार, अध्यक्ष ‘निमा’, नाशिक

नाशिक औद्योगिक परिसरातील गुंतवणुकीवर दृष्टिक्षेप

  • महिंद्रा आणि महिंद्रा : १० हजार कोटींपेक्षा अधिक

    स्थान: इगतपुरीजवळ, नाशिक

    उत्पादन: इलेक्ट्रिक वाहन

    रोजगार: अंदाजे ५ हजार

  • ग्राफाईट इंडिया लिमिटेड : ४,७६१ कोटी

    स्थान: मुंधेगाव, इगतपुरी, नाशिक

    उत्पादन: सिंथेटिक ग्रॅफाईट

    ॲनोड मटेरियल

    रोजगार: १.१६६

  • व्हर्च्युओसो ओप्तोइलेक्ट्रोनिक्स : ८०० कोटी

    स्थान: दिंडोरी, नाशिक

    उत्पादन: इलेक्ट्रॉनिक्स आणि मोटर कम्पोनेंट्स

    रोजगार: ५००

  • एपिरोक एबी : ३५० कोटी

    स्थान: गोटे दुगमाळा, ४२ एकर एमआयडीसी, नाशिक

    उत्पादन: खाण आणि बांधकाम उपकरण,आर ॲण्ड डी सुविधा, उत्पादन युनिट

    रोजगार: २००

मुळात नाशिकमध्ये उद्योग येत नाही, ही ओरड अव्यवहार्य वाटते. कोणत्याही उद्योगसमूहाने प्रकल्प उभारणीची घोषणा केल्यानंतर प्रत्यक्ष उत्पादनास काही वर्षांचा अवधी लागतो. एबीबी, रिलायन्स लाइफस्टाईल ही त्यापैकीच काही उदाहरणे होत. नाशिकमधील कृषी निर्यातीचा आलेख गेल्या काही वर्षांत कमालीचा वाढला आहे. नाशिकचे महत्त्व कळणाऱ्या उद्योगसमूहांची पावले इकडे वळण्यास आता प्रारंभ झाला.
प्रदीप पेशकार, प्रदेश प्रभारी, भाजप उद्योग आघाडी, नाशिक

पुणे जमीन व्यवहार रद्द! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

मुंब्रा अपघात अतिगर्दीमुळे; आरोपी अभियंत्यांचा न्यायालयात दावा

माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांनीच रचला! धनंजय मुंडे - जरांगे यांच्यात जुंपली

गुन्ह्याची माहिती न दिल्यास विजयी उमेदवारही ठरणार अपात्र; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

दिल्ली विमानतळावर 'ट्रॅफिक जाम'; ३०० हून अधिक विमानांना विलंब; हवाई नियंत्रण कक्ष यंत्रणेत बिघाड