प्रातिनिधिक छायाचित्र  
बिझनेस

MMR, पुण्यातील घरांची विक्री ३० टक्क्यांनी घसरली; किमतीत वाढ झाल्याचा परिणाम

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि पुण्यातील घरांची विक्री या वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत ३० टक्क्यांनी घसरून ४१,९०१ युनिट्सवर आली, असे प्रॉपटायगरने म्हटले आहे. महाराष्ट्रातील वरील दोन महत्त्वाच्या मालमत्ता बाजारपेठा असलेल्या एमएमआर आणि पुण्यातील एकत्रित घरांची विक्री गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ६०,१९१ युनिट्सवर होती.

Swapnil S

नवी दिल्ली : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि पुण्यातील घरांची विक्री या वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत ३० टक्क्यांनी घसरून ४१,९०१ युनिट्सवर आली, असे प्रॉपटायगरने म्हटले आहे. महाराष्ट्रातील वरील दोन महत्त्वाच्या मालमत्ता बाजारपेठा असलेल्या एमएमआर आणि पुण्यातील एकत्रित घरांची विक्री गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ६०,१९१ युनिट्सवर होती.

गृहनिर्माण ब्रोकरेज फर्म प्रॉपटायगरने सोमवारी आकडेवारी जाहीर केली, त्यामध्ये दिसून आले की, भारतातील आठ प्राथमिक निवासी बाजारपेठांमध्ये या वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत विक्री १४ टक्क्यांनी घसरून ९७,६७४ युनिट्सवर आली आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत १,१३,७६८ युनिट्स होती.

घरांच्या विक्रीत आणि नवीन लाँचमध्ये अल्पकालीन घट ही मागणी कमी होण्याचे लक्षण नसून पुनर्संचयित करण्याचे लक्षण आहे. परवडणाऱ्या किमतीच्या दबावामुळे, विशेषतः बजेट आणि मध्यम उत्पन्न गटांमध्ये, खरेदीदारांमध्ये काही सावध भावना निर्माण झाल्या आहेत, असे प्रॉपटायगर.कॉमचे विक्री प्रमुख श्रीधर श्रीनिवासन म्हणाले. तथापि, श्रीनिवासन यांनी नमूद केले की मूळ मागणी कायम आहे.

एमएमआरमध्ये ३२ टक्के, पुण्यात २७ टक्के घसरण

एमएमआरमध्ये घरांची विक्री ३२ टक्क्यांनी घसरून ३८,२६६ युनिटवरून २५,९३९ युनिटवर आली. पुण्यात विक्री २७ टक्क्यांनी घसरून २१,९२५ युनिटवरून १५,९६२ युनिटवर आली. अहमदाबादमध्ये, घरांची विक्री १ टक्क्यांनी घसरून ९,५०० युनिटवरून ९,४५१ युनिटवर आली. दिल्ली-एनसीआरमध्ये विक्री ९ टक्क्यांनी घसरून ११,०६५ युनिट्सवरून १०,०५१ युनिट्सवर आली, तर हैदराबादमध्ये ६ टक्क्यांनी घसरून १२,२९६ युनिट्सवरून ११,५१३ युनिट्सवर आली. तथापि, बंगळुरूमध्ये विक्री १६ टक्क्यांनी वाढून १३,४९५ युनिट्सवरून १५,६२८ युनिट्सवर पोहोचली. चेन्नईमध्येही घरांची विक्री ३३ टक्क्यांनी वाढून ३,९८४ युनिट्सवरून ५,२८३ युनिट्सवर पोहोचली.

कोलकातामध्ये निवासी मालमत्तेची विक्री या वर्षी एप्रिल-जूनमध्ये १९ टक्क्यांनी वाढून ३,८४७ युनिट्सवर पोहोचली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत ३,२३७ युनिट्स होती.

आठ शहरांच्या दिल्ली-एनसीआरमध्ये गुरुग्राम, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि फरीदाबाद आणि एमएमआर मार्केटमध्ये मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे यांचा समावेश आहे.

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल