एक्स @narendramodi
बिझनेस

‘टेस्ला’चा भारतातील प्रवेश पक्का; नरेंद्र मोदी-एलॉन मस्क यांच्यात चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘टेस्ला’चे संस्थापक एलॉन मस्क यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. ही चर्चा तंत्रज्ञान आणि नवे उपक्रम क्षेत्रातील पुढचे पाऊल असल्याचे मानले जात आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘टेस्ला’चे संस्थापक एलॉन मस्क यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. ही चर्चा तंत्रज्ञान आणि नवे उपक्रम क्षेत्रातील पुढचे पाऊल असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे लवकरच ‘टेस्ला’ कंपनी भारतामध्ये उत्पादन सुरू करणार असल्याची जोरदार चर्चा असून मोदी आणि मस्क यांच्यातील चर्चेनंतर ‘टेस्ला’चा भारतातील प्रवेश पक्का झाल्याचे संकेत दिले जात आहेत.

फेब्रुवारी महिन्यात मोदी आणि मस्क याची अमेरिकेत भेट झाली होती. या भेटीनंतर टेस्ला कंपनी भारतात मोठी रोजगारनिर्मिती करणार असल्याची चर्चा सुरू झाली. आता त्यातील पुढचे पाऊल म्हणजे मोदी आणि मस्क यांच्यात पुन्हा एकदा फोनवरून चर्चा झाली असून तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रातील कामाबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली. नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वरून ही माहिती दिली.

मोदी यांनी म्हटले आहे की, मी शुक्रवारी एलॉन मस्क यांच्याशी संवाद साधला. वॉशिंग्टनच्या भेटीत ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली होती, त्याबाबत संवाद साधण्यात आला. तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात एकत्र काम करण्याच्या प्रचंड क्षमतेवर आम्ही चर्चा केली. भारत या क्षेत्रात अमेरिकेसोबतची भागीदारी आणखी मजबूत करण्यास पूर्णपणे तयार आहे.फेब्रुवारी महिन्यात मस्क आणि मोदी यांची भेट झाल्यानंतर एलॉन मस्क भारतात मोठी नोकरभरती करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार त्यांनी ‘कस्टमर सर्व्हिस’ आणि ‘बॅकएंड’ पदांसाठी भरती सुरू केली होती. यापैकी पाच पदे मुंबई आणि दिल्ली या महत्त्वाच्या शहरांमधून भरण्यात येणार होती. या नोकरभरतीच्या वृत्तानंतर एलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ने भारती एअरटेल आणि जिओबरोबर करार केला होता.

त्यानुसार एअरटेलने भारतातील ग्राहकांसाठी स्टारलिंकची हाय-स्पीड इंटरनेट सेवा आणण्यासाठी एलॉन मस्कच्या ‘स्पेसएक्स’सोबत करार केला. एअरटेलने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतातील हा पहिला करार आहे. यामुळे ‘स्पेसएक्स’ला भारतात स्टारलिंकची उपकरणे विकण्यासाठी परवानगी देण्यात आली. या दोन्ही वृत्तानंतर आता मोदींनी पुन्हा एकदा मस्क यांच्याशी संवाद साधल्याने लवकरच भारतात मस्क यांचा नवा उपक्रम सुरू होणार असल्याची किंवा ‘टेस्ला’चा भारतातील प्रवेश पक्का झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

‘टेस्ला’ भारतात ३ ते ५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार

मस्क यांची ‘टेस्ला’ कंपनी भारतात प्रवेश मिळवण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे. या पार्श्वभूमीवर ‘टेस्ला’चे अधिकारी लवकरच भारतात येतील. मस्क यांच्या ‘टेस्ला’ला आयात शुल्कात सूट मिळविण्यासाठी भारत सरकारच्या योजनेंतर्गत अर्ज करावा लागेल. यासोबतच, सरकारी सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाला, तर ‘टेस्ला’ने उत्पादनासाठी गुजरातसह महाराष्ट्रातील चाकण आणि छत्रपती संभाजीनगर हे पसंतीचे ठिकाण म्हणून निवडले आहे. एलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी ‘टेस्ला’ भारतात ३ ते ५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करू शकते, असेही मानले जाते.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली