बिझनेस

निस्सान-होंडातील विलीनीकरण रद्द

जपानी वाहन कंपन्या निस्सान-होंडा यांनी विलीनीकरण करण्याचे ठरवले होते. आता या दोन्ही कंपन्यांनी आपलेच व्यवसाय वेगळेच राहू देण्याचे ठरवले आहे.

Swapnil S

टोकियो : जपानी वाहन कंपन्या निस्सान-होंडा यांनी विलीनीकरण करण्याचे ठरवले होते. आता या दोन्ही कंपन्यांनी आपलेच व्यवसाय वेगळेच राहू देण्याचे ठरवले आहे. या दोन्ही कंपन्यांनी गेल्यावर्षी विलीनीकरण करण्यासाठी सामंजस्य करार केला होता.

या दोन्ही कंपन्यांमध्ये करार झाला असता, तर ६० अब्ज डॉलरचा (५.२१ लाख कोटी) समूह बनला असता. टोयोटा, फॉक्सवॅगन आणि हुंडई यांच्यानंतरचा वाहन विक्रीतील जगातील दुसऱ्या क्रमांकाचा समूह बनला असता.

या करारातून माघार घेण्याचा पहिला निर्णय निस्सानने घेतला. कारण होंडाला वाटत होते की, निस्सान ही त्यांची सहाय्यक कंपनी बनायला हवी. त्यामुळे दोन्ही कंपन्यातील मतभेद वाढत गेले. या करारातील आणखी एक कंपनी मित्सुबिशी मोटर्सने विलीनीकरणावर विचार करण्याचे ठरवले होते.

चीन व अमेरिकन बाजारपेठेतील विक्री व नफा घटल्याने कंपन्यांना आपल्या कामगार व उत्पादन क्षमतेत कपात करावी लागली. गेल्या काही वर्षांत या कंपन्यांना नफ्यात ७० टक्के कपात झाली. दोन मोठ्या बाजारपेठांमध्ये हिस्सेदारी कमी झाल्याने कंपन्यांनी एकत्रित होण्याचा निर्णय घेतला होता.

इराणी युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीचा हल्ला, ८७ ठार; श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात जहाजाला जलसमाधी

तेंडुलकर कुटुंबात सनई-चौघडे! अर्जुन तेंडुलकर-सानिया चंडोक विवाहबद्ध; राजकारणी ते बॉलिवूड दिग्गजांची उपस्थिती

IND vd ENG ICC T20 WC26 : वानखेडेवर आज अहमदाबादचे तिकीट? इंग्लंडला नमवून अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे ध्येय

पुण्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग चाचणी

मिठी नदी गाळ घोटाळा : EOW कडून दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल