संजय मल्होत्रा  
बिझनेस

RBI जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सतर्क आणि लवचिक; नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे प्रतिपादन

नव्या आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी सांगितले की, रिझर्व्ह बँक धोरणात्मक बाबींमध्ये सातत्य आणि स्थिरता टिकवून ठेवेल. परंतु सध्याच्या जागतिक आर्थिक आणि राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सतर्क आणि लवचिक राहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Swapnil S

मुंबई : नव्या आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी सांगितले की, रिझर्व्ह बँक धोरणात्मक बाबींमध्ये सातत्य आणि स्थिरता टिकवून ठेवेल. परंतु सध्याच्या जागतिक आर्थिक आणि राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सतर्क आणि लवचिक राहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

मल्होत्रा यांनी आज २६वे रिझर्व्ह बँक गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला. मुदत संपल्यानंतर शक्तिकांत दास यांनी सहा वर्षांच्या कार्यकाळानंतर पदाचा राजीनामा दिला.

आपल्याला सातत्य आणि स्थिरता राखण्याची जाणीव असली पाहिजे, परंतु त्यामध्ये अडकून न राहता आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सतर्क आणि लवचिक राहावे लागेल, असे मल्होत्रा यांनी गव्हर्नर म्हणून माध्यमांसमोर पहिल्या संवादात सांगितले.

आपल्या छोट्या निवेदनात मल्होत्रा यांनी रिझर्व्ह बँक आर्थिक नियामक, राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यांच्यासह सर्व भागधारकांशी संवाद साधत आरबीआयची परंपरा पुढे नेईल, असे स्पष्ट केले.

आपल्याकडे सर्व ज्ञानाचे एकाधिकार नाही आणि इतर भागधारकांसोबत व्यापक सल्लामसलतीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. आरबीआय तांत्रिक साधनांचा अधिक व्यापक उपयोग करून आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देईल, असे माजी महसूल सचिव मल्होत्रा यांनी सांगितले.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता