मुंबई : आरबीआयने शुक्रवारी सर्व बँकांना २०२४-२५ मधील सर्व सरकारी व्यवहारांचे कामकाज सुलभ करण्यासाठी ३१ मार्च रोजी विशेष ‘क्लिअरिंग’ कामकाज करणे बंधनकारक असल्याचा आदेश एका परिपत्रकात दिला आहे. भारतात १ एप्रिल ते ३१ मार्च हे आर्थिक वर्ष आहे.
सप्ताहाअखेर आणि ईद-अल-फित्र असूनही, देशभरातील प्राप्तिकर कार्यालये तसेच सीजीएसटी कार्यालये २९ ते ३१ मार्च रोजी सुरू राहतील. ३१ मार्चला सोमवार आहे. यापूर्वी, आरबीआयने म्हटले होते की, २०२४-२५ साठी एजन्सी बँकांनी केलेले सर्व सरकारी व्यवहार त्याच आर्थिक वर्षात जमा केले पाहिजेत.
३१ मार्च २०२५ रोजी सर्व एजन्सी बँकांना सरकारी व्यवहारांशी संबंधित काऊंटरवरील व्यवहारांसाठी सरकारी पावत्या आणि देयके हाताळणाऱ्या सर्व शाखा ३१ मार्च २०२५ रोजी सामान्य कामकाजाच्या तासांपर्यंत खुल्या ठेवण्यास सांगितले होते.
शुक्रवारी एका परिपत्रकात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने म्हटले आहे की, चेक ट्रंकेशन सिस्टम (सीटीएस) अंतर्गत सामान्य क्लिअरिंग वेळा ३१ मार्च २०२५ दर सोमवार प्रमाणे सुरू राहतील.
यापुढे, ३१ मार्च २०२५ पर्यंत चालू आर्थिक वर्षाच्या (२०२४-२५) सर्व सरकारी व्यवहारांचे लेखांकन सुलभ करण्यासाठी ३१ मार्च रोजी केवळ सरकारी धनादेशांसाठी सीटीएस३ अंतर्गत विशेष क्लिअरिंग आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यात म्हटले आहे.
तसेच, सर्व बँकांना ३१ मार्च २०२५ रोजी विशेष क्लिअरिंग ऑपरेशनमध्ये सहभागी होणे बंधनकारक आहे. सीटीएस अंतर्गत विशेष क्लिअरिंग कामकाज करणाची वेळ १७.०० ते १७.३० वाजेपर्यंत आणि परतीचे सत्र १९.०० तास ते १९.३० वाजेपर्यंत असेल.