बिझनेस

८५.२७ रुपयाची नवी सार्वकालिक नीचांकी पातळी; डॉलरच्या तुलनेत १२ पैशांनी गडगडला, सलग तिसऱ्या सत्रात कमकुवत

रुपया सलग तिसऱ्या सत्रात कमकुवत राहिला आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १२ पैशांनी गडगडून ८५.२७ या नव्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर बंद झाला.

Swapnil S

मुंबई : रुपया सलग तिसऱ्या सत्रात कमकुवत राहिला आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १२ पैशांनी गडगडून ८५.२७ या नव्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर बंद झाला. विदेशात मजबूत डॉलर होणे आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमध्ये गुरुवारी यूएस डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी घसरला.

विदेशी मुद्रा व्यापाऱ्यांनी सांगितले की, आयातदारांकडून महिन्याच्या शेवटी तसेच वर्षाच्या शेवटी डॉलरची मागणी वाढली आणि डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या आक्रमक आयात शुल्काच्या भीतीने अमेरिकन चलनाला आणखी बळ मिळाले.

इंटरबँक फॉरेक्स मार्केटमध्ये गुरुवारी रुपया ८५.२३ इतका कमकुवत उघडला आणि दिवसभरात डॉलरच्या तुलनेत ८५.२८ या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर गेला. दिवसअखेरीस रुपया डॉलरच्या तुलनेत ८५.२७ या आजीवन नीचांकी पातळीवर बंद झाला. त्याच्या मागील बंदच्या तुलनेत १२ पैशांचा घसरण झाली.

याआधी सोमवारी रुपया ९ पैशांनी घसरल्यानंतर एका दिवसानंतर मंगळवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ४ पैशांनी घसरून ८५.१५ वर बंद झाला होता. ख्रिसमसनिमित्त बुधवारी विदेशी चलन बाजार बंद होता.

मिराई ॲसेट शेअरखानचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, मजबूत डॉलर होणे आणि वाढत्या यूएस ट्रेझरी उत्पन्नामुळे रुपया सात महिन्यांतील उच्चांकी पातळीवर गेला आहे. तसेच, कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ, महिन्याच्या शेवटी/वर्षाच्या शेवटी डॉलरची मागणी आणि एफआयआयने निधी काढून घेणे याचाही रुपयावर दबाव राहात आहेत, असे ते म्हणाले.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता