FPJ
बिझनेस

बुच यांच्या राजीनाम्यावर सेबी कर्मचारी ठाम, मुख्यालयाबाहेर केली निदर्शने

सेबीच्या प्रमुख माधबी पुरी-बुच यांच्या राजीनाम्यासाठी सेबीच्या काही कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली.

Swapnil S

मुंबई : सेबीच्या प्रमुख माधबी पुरी-बुच यांच्या राजीनाम्यासाठी सेबीच्या काही कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. केंद्रीय अर्थ खात्याला सेबीने लिहिलेल्या पत्रात, कर्मचाऱ्यांचा उल्लेख अव्यावसायिक केला होता. तसेच काही ‘बाह्यशक्ती’ सेबीच्या कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहेत, असे म्हटले होते. या वक्तव्यांना कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. गुरुवारी केलेल्या निदर्शनांमध्ये ४०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. सेबीप्रमुख माधबी पुरी-बुच यांनी राजीनामा द्यावा व केंद्रीय

अर्थखात्याला दिलेले पत्र मागे घ्यावे, अशी मागणी संतप्त कर्मचाऱ्यांनी केली. दरम्यान, सेबीने अव्यावसायिक कार्यसंस्कृती व खराब वातावरणाचा दावा फेटाळून लावत कर्मचाऱ्यांनाच बोल लावले. सेबीच्या ५०० कर्मचाऱ्यांनी केंद्रीय अर्थखात्याला पत्र लिहून सेबीत कामाचा ताण वाढल्याची व संस्थेतील वातावरण तणावपूर्ण झाले आहे, अशी तक्रार केली होती. सेबीने कर्मचाऱ्यांच्या पत्रावर खुलासा करताना सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या चिंतेमागे ‘बाह्य’शक्तीचा हात आहे. वाढीव घरभाडे भत्ता व अंतर्गत कार्यप्रणालीबाबत कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली जात आहे.

सेबीप्रमुखांची स्वतंत्र चौकशी करा -काँग्रेस

नवी दिल्ली : सेबीप्रमुख माधबी पुरी-बुच यांच्यावर होणाऱ्या सतत आरोपांमुळे त्यांची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. भारतीय शेअर बाजाराबाबत निर्माण झालेला संशय दूर करण्यासाठी व परदेशी गुंतवणूकदारांमध्ये साशंकता राहू नये म्हणून बुच यांची चौकशी होणे गरजेचे आहे.

INS Udaygiri: ‘उदयगिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात; स्वीकृती दस्तावेजावर स्वाक्षरी, बघा काय आहे खासियत?

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलवादी? विधानसभेत आमदार मनीषा कायंदे काय म्हणाल्या? बघा Video

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी; प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पालिका करणार हायकोर्टात अर्ज

पुण्यातील नद्यांच्या पूररेषा नव्याने आखाव्यात; ४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Dombivli : ''घरी कोणीही नाही, फाशी घे''...तरुणीचा WhatsApp मेसेज अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; गुन्हा दाखल