बांगलादेशात पुन्हा हिंसाचार : प्रसिद्ध रॉकस्टार जेम्सच्या कॉन्सर्टवर हल्ला; तस्लीमा नसरीन यांची संतप्त प्रतिक्रिया, "जिहादींनी जेम्सला...

बांगलादेशातील फरिदपूर येथे प्रसिद्ध गायक जेम्स (नगर बाऊल) यांच्या कार्यक्रमावर कट्टरपंथीय जमावाने हल्ला केल्याने कॉन्सर्ट रद्द करण्यात आली. दगडफेकीत २५ जण जखमी झाले असून तस्लीमा नसरीन यांनी घटनेचा निषेध केला.
बांगलादेशात पुन्हा हिंसाचार : प्रसिद्ध रॉकस्टार जेम्सच्या कॉन्सर्टवर हल्ला; तस्लीमा नसरीन यांची  संतप्त प्रतिक्रिया, "जिहादींनी जेम्सला...
बांगलादेशात पुन्हा हिंसाचार : प्रसिद्ध रॉकस्टार जेम्सच्या कॉन्सर्टवर हल्ला; तस्लीमा नसरीन यांची संतप्त प्रतिक्रिया, "जिहादींनी जेम्सला...
Published on

बांगलादेशातील प्रसिद्ध रॉकस्टार जेम्स यांच्या कार्यक्रमावर फरिदपूर शहरात हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी (दि.२६) रात्री ९ वाजता होणाऱ्या या मैफलीआधी कट्टरपंथीय जमावाने मंचावर धाव घेत कलाकार आणि प्रेक्षकांवर दगडफेक केल्याचा आरोप स्थानिक माध्यमांनी केला आहे. या घटनेवर प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरीन यांनी संताप व्यक्त केला.

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी रात्री एका शाळेच्या आवारात जेम्स यांचा कार्यक्रम होणार होता. कार्यक्रम सुरू होण्याआधी बाहेरील काही लोकांनी जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. प्रवेश नाकारल्यानंतर या जमावाने प्रेक्षकांवर आणि मंचाच्या दिशेने विटा व दगडफेक सुरू केली, त्यामुळे कार्यक्रमस्थळी मोठी अफरातफर माजली. या हिंसाचारात किमान २५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अखेर कार्यक्रम रद्द

या हल्ल्याला उपस्थित प्रेक्षकांपैकी काही विद्यार्थ्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने अखेर कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय आयोजकांना घ्यावा लागला. सुदैवाने, जेम्स यांना कोणतीही इजा न होता कार्यक्रमस्थळावरून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार : प्रसिद्ध रॉकस्टार जेम्सच्या कॉन्सर्टवर हल्ला; तस्लीमा नसरीन यांची  संतप्त प्रतिक्रिया, "जिहादींनी जेम्सला...
बांगलादेशातील हिंसाचारावर भारत आक्रमक; परराष्ट्र मंत्रालयाकडून कारवाईची मागणी, "अल्पसंख्याकांच्या विरोधातील शत्रुत्व...

रात्री १० वाजता आयोजन समितीचे संयोजक मुस्तफिजूर रहमान शमीम यांनी मंचावरून घोषणा करत सांगितले की, "फरिदपूर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार जेम्स यांचा कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे."

ही मैफल फरीदपूर जिल्ह्यातील एका शाळेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आली होती. फरिदपूर हे राजधानी ढाकापासून सुमारे १२० किमी अंतरावर आहे.

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार : प्रसिद्ध रॉकस्टार जेम्सच्या कॉन्सर्टवर हल्ला; तस्लीमा नसरीन यांची  संतप्त प्रतिक्रिया, "जिहादींनी जेम्सला...
बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीनांचा कट्टर विरोधक उस्मान हादीच्या मृत्यूनंतर हिंसाचार; हिंदू तरुणाला ठार केले, मीडिया कार्यालयांना जाळले

तस्लीमा नसरीन संतप्त

या घटनेवर प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरीन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी X वर लिहिले, “छायानट ही सांस्कृतिक संस्था जाळून टाकण्यात आली आहे. संगीत, नाट्य, नृत्य आणि लोककलेतून धर्मनिरपेक्ष विचार रुजवणारी उदीची संस्थाही उद्ध्वस्त करण्यात आली आहे. आज जिहादींनी जेम्ससारख्या प्रसिद्ध गायकालाही गाण्याची संधी दिली नाही.”

विशेष म्हणजे, तस्लिमा नसीन यांनाही त्यांच्या लेखनामुळे कट्टरपंथीयांकडून धमक्या मिळाल्यानंतर १९९४ मध्ये बांगलादेश सोडावा लागला होता.

बांगलादेशात हिंसाचार

दरम्यान, बांगलादेशात अलीकडेच युवक नेता शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येनंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला आहे. सिंगापूरमधील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्याआधी त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

याच पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक समुदायांवर हल्ल्यांच्या घटनाही वाढल्या असून, अमृत मंडल आणि दीपू चंद्र दास या दोन हिंदू युवकांना जमावाने ठार मारल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांवर भारताने तीव्र चिंता व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार : प्रसिद्ध रॉकस्टार जेम्सच्या कॉन्सर्टवर हल्ला; तस्लीमा नसरीन यांची  संतप्त प्रतिक्रिया, "जिहादींनी जेम्सला...
Tarique Rahman : १७ वर्षांनंतर बांगलादेशात घरवापसी करणारे तारिक रहमान नेमके कोण?

जेम्स - ‘गुरु ऑफ रॉक’

जेम्स हे बांगलादेशातील ‘गुरु ऑफ रॉक’ म्हणून ओळखले जातात. ते नगर बाऊल या प्रसिद्ध रॉक बँडचे मुख्य गायक, गीतकार आणि गिटार वादक आहेत. बांगलादेशात सध्या सुरू असलेल्या हिंसाचाराच्या नव्या लाटेमुळे कलाकार, सांस्कृतिक संस्था आणि परफॉर्मर्सवर हल्ले वाढत असल्याचे चित्र आहे.

logo
marathi.freepressjournal.in