बिझनेस

भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स यांच्यात धोरणात्मक भागीदारी; वित्तीय सेवांसाठी डिजिटल मंच तयार करणार

दूरसंचार सेवा कंपनी भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स या देशातील खासगी क्षेत्रातील बिगर बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) यांनी वित्तीय सेवांसाठी भारतातील सर्वात मोठे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी आणि शेवटच्या टप्प्यातील वितरणात बदल करण्यासाठी एक धोरणात्मक भागीदारी करण्याचे जाहीर केले आहे.

Swapnil S

मुंबई : दूरसंचार सेवा कंपनी भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स या देशातील खासगी क्षेत्रातील बिगर बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) यांनी वित्तीय सेवांसाठी भारतातील सर्वात मोठे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी आणि शेवटच्या टप्प्यातील वितरणात बदल करण्यासाठी एक धोरणात्मक भागीदारी करण्याचे जाहीर केले आहे.

या भागीदारीमुळे एअरटेलचे ३७०दशलक्ष, १२ लाखांहून अधिक भक्कम वितरण नेटवर्क आणि बजाज फायनान्सचे २७ उत्पादन श्रेणींचे वैविध्यपूर्ण समूह आणि ५ हजारांहून अधिक शाखा आणि ७० हजार फील्ड एजंट्सचे वितरण प्रभाव एकत्र येत आहेत.

गोपाल विठ्ठल, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, भारती एअरटेल म्हणाले, एअरटेल सुरुवातीला आपल्या एअरटेल थँक्स ॲपवर बजाज फायनान्सची किरकोळ वित्तीय उत्पादने सुलभ व सुरक्षित ग्राहक अनुभवासाठी देऊ करणार आहे आणि नंतर स्टोअर्सच्या देशव्यापी नेटवर्कद्वारे प्रदान करणार आहे.

राजीव जैन, व्यवस्थापकीय संचालक, बजाज फायनान्स म्हणाले, वित्तीय उत्पादने आणि सेवांमध्ये लक्षणीय वाढ करणे कंपन्यांच्या डिजिटल मालमत्तेच्या एकत्रित सामर्थ्यामुळे एअरटेल व बजाज फायनान्सला शक्य होणार आहे.

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : निवडणुकांमध्ये बाजी कोणाची? कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?

"तेच मशीन, तीच सेटिंग अन् तोच पैसा..." निवडणुकांच्या निकालावर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

"आज माझ्या एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू..." विजयानंतर निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

Thane : अवैध बांधकाम केल्यास नगरसेवक पद जाणार; निवडणुकीपूर्वी उमेदवारांना द्यावे लागणार शपथपत्र

आता टोल नाक्यांवर AI; जाता येणार ८०च्या वेगाने; थांबण्याची, ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी