बिझनेस

रिलायन्स-वॉल्ट डिस्नेत खोडा, भारतीय स्पर्धा आयोगाने आक्षेप घेतल्याने विलीनीकरण अधुरे

मनोरंजन क्षेत्रातील दोन कंपन्यांच्या विलीनीकरणामुळे प्रतिस्पर्धांना फटका बसेल, अशी शंका उपस्थित झाल्याने रिलायन्स खरेदी करणार असलेल्या वॉल्ट डिस्नेवर पाणी फेरले गेले आहे.

Swapnil S

मुंबई : मनोरंजन क्षेत्रातील दोन कंपन्यांच्या विलीनीकरणामुळे प्रतिस्पर्धांना फटका बसेल, अशी शंका उपस्थित झाल्याने रिलायन्स खरेदी करणार असलेल्या वॉल्ट डिस्नेवर पाणी फेरले गेले आहे. भारतीय स्पर्धा आयोगानेच याबाबत खोडा घातला असून ८.५ अब्ज डॅलरच्या विलीनीकरणाची प्रक्रिया बासनात गेल्यात जमा आहे.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सच्या मालकीच्या कंपनीकडे क्रिकेटच्या प्रसारणासाठी अब्जावधी डॉलरचे लाभदायी हक्क मिळणार होते. परिणामी दरयुद्ध पेटण्याची शक्यता निर्माण होऊन जाहिरातदारांवरील रिलायन्सची पकड वाढण्याचीही चिन्हे होती.

रिलायन्स आणि वॉल्ट डिस्ने मीडिया संपत्तीच्या भारतीय विलीनीकरणामुळे क्रिकेटच्या प्रसारण अधिकारांवरील अधिकारामुळे स्पर्धेला हानी पोहोचते, असे आयोगाने म्हटले आहे. नियोजित विलीनीकरणाला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात असून आयोगाने डिस्ने आणि रिलायन्सला आपले मत नोंदविण्यास सांगितले आहे. याबाबत कंपन्यांना चौकशीचे आदेश का दिले जाऊ नयेत, हेही स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सच्या मालकीची बहुसंख्य कंपनी असणाऱ्या विलीनीकरण कंपनीकडे क्रिकेटच्या प्रसारणासाठी अब्जावधी डॉलरचे लाभदायी हक्क असतील. यामुळे किमतींची शक्ती आणि जाहिरातदारांवरील पकड यावर भीती निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने यापूर्वी रिलायन्स आणि डिस्नेला विलीनीकरणाशी संबंधित १०० प्रश्नांची सरबत्ती केली होती. कंपन्यांनी नियामकाला सांगितले की, मनोरंजन क्षेत्रातील वर्चस्वाबाबतची धास्ती कमी करण्यासाठी आणि त्वरित मान्यता मिळविण्यासाठी १० पेक्षा कमी वाहिन्या विकण्यास तयार आहेत.

तपासणीचा सामना

फेब्रुवारीमध्ये घोषित केलेल्या या बड्या विलीनीकरणास कठोर तपासणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. भारतातील सर्वात मोठी मनोरंजन कंपनी याद्वारे अस्तित्वात येणार होती. त्यांचे एकत्रित १२० दूरचित्रवाहिन्या तसेच दोन

स्ट्रीमिंग सेवेद्वारे रिलायन्सची सोनी, झी एंटरटेन्मेंट, नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉनबरोबर स्पर्धा मानली जात होती.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता