‘गुंतवणूक ऋषी’ वॉरेन बफेट आज निवृत्त होणार; जगातील यशस्वी गुंतवणूकदार म्हणून नावलौकिक कमावला  
बिझनेस

‘गुंतवणूक ऋषी’ वॉरेन बफेट आज निवृत्त होणार; जगातील यशस्वी गुंतवणूकदार म्हणून नावलौकिक कमावला

केवळ गुंतवणुकीतून अब्जावधी डॉलरची संपत्ती निर्माण करणारे जगातील गुंतवणूक ऋषी वॉरेन बफेट (९५) आज निवृत्त होत आहेत. ‘बर्कशायर हॅथवे’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून बफेट यांनी पायउतार होण्याची घोषणा केली होती. आता ‘बर्कशायर हॅथवे’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ग्रेग एबल यांची नियुक्ती होत आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : केवळ गुंतवणुकीतून अब्जावधी डॉलरची संपत्ती निर्माण करणारे जगातील गुंतवणूक ऋषी वॉरेन बफेट (९५) आज निवृत्त होत आहेत. ‘बर्कशायर हॅथवे’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून बफेट यांनी पायउतार होण्याची घोषणा केली होती. आता ‘बर्कशायर हॅथवे’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ग्रेग एबल यांची नियुक्ती होत आहे.

वॉरेन बफेट यांच्या निवृत्तीने सहा दशकांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या नेतृत्वाच्या अध्यायाचा शेवट होणार आहे, ज्याने कंपनीचे स्वरूप आणि दिशाच बदलून टाकली. अमेरिकन भांडवलशाहीचे रूप बदलणाऱ्या एका युगाचा शेवट होत आहे; मात्र दीर्घकालीन मालकीच्या (लाँग-टर्म ओनरशिप) संस्कृतीबाबत समूहाची बांधिलकी कायम असल्याचेही यातून अधोरेखित होते. बफेट यांची कंपनी अमेरिकेतील नवव्या क्रमांकाची सर्वाधिक मौल्यवान आहे. या कंपनीचे बाजारमूल्य १ ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक आहे.

बफेट उद्या जबाबदारी सोडतील तेव्हा त्यांनी जवळपास अपयशी ठरत असलेल्या एका कापड कंपनीचे त्यांनी बहुराष्ट्रीय समूहात रूपांतर केले. जवळपास ६० वर्षांचा हा प्रवास पूर्ण होईल.

बफेट यांनी मे २०२५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर करताच कंपनीच्या भागधारकांना प्रथमच धक्का दिला. त्यांनी दीर्घकाळ उपाध्यक्ष असलेले ग्रेग एबेल यांची आपला उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली. मात्र, बफेट कंपनीचे अध्यक्ष आणि प्रमुख भागधारक म्हणून कायम राहतील तसेच आपल्या अनुभव व दूरदृष्टीच्या आधारे कंपनीला मार्गदर्शन करत राहतील.

कधीकाळी तोट्यात असलेल्या कापड कंपनीपासून सुरुवात झालेल्या बर्कशायर हॅथवेने त्यांच्या नेतृत्वाखाली विमा, रेल्वे, ऊर्जा आणि उत्पादन क्षेत्रातील प्रचंड गुंतवणुकींसह एक शक्तिशाली समूह बनला. कोका-कोला, ॲपल, ड्युरासेल, डेअरी क्वीन, अमेरिकन एक्स्प्रेस आणि गेको यांसारख्या नामांकित ब्रँडमध्ये मोठ्या प्रमाणावर समभाग खरेदी करत त्यांनी गुंतवणूक केली.

शिस्तबद्ध गुंतवणुकीचा प्रणेता

बाजारातील गाजावाजा किंवा झटपट नफ्याच्या मागे न लागता बफेट यांनी सातत्याने स्थिर नफा देणाऱ्या, विश्वासार्ह नेतृत्व असलेल्या आणि दीर्घकालीन मजबूत भवितव्य असलेल्या उच्च दर्जाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यावर भर दिला. ही शिस्तबद्ध गुंतवणूक पद्धत त्यांच्या मार्गदर्शक आणि ‘मूल्य गुंतवणुकीचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे बेंजामिन ग्रॅहम यांच्या शिकवणीने घडवली होती.

राज्य निवडणूक आयोगाकडून BMC निवडणुकीसाठी निरीक्षकांची नियुक्ती; इक्बाल सिंग चहल यांच्यावर मोठी जबाबदारी

"ही तर इच्छाधारी मेट्रो..." ; एकता कपूरच्या Naagin 7 चं हटके प्रमोशन, व्हायरल Videoवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

BMC Election 2026 : भाजपकडून १३६ उमेदवार निश्चित; कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार, वाचा सविस्तर

धावत्या व्हॅनमध्ये तरुणीवर गँगरेप; लिफ्टच्या बहाण्याने गाडीत बसवलं अन्...

३१ डिसेंबरची हाऊस पार्टी फ्लॉप? 'या' होम डिलिव्हरी ॲप्सचे कामगार संपावर; तुमच्या शहरात डिलिव्हरी चालू की बंद? जाणून घ्या सविस्तर