बिझनेस

इलेक्ट्रिक वाहनं कंपनीनं सांगितलेल्या रेंजपेक्षा कमी रेंज का देतात?

Suraj Sakunde

मुंबई: अलीकडच्या काळात देशात अनेक कंपन्यांनी आपली इलेक्ट्रिक वाहनं लॉन्च केली आहेत. स्कूटरपासून ते कारपर्यंत देशात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करण्याकडं लोकांचा कल वाढला असला तरी इलेक्ट्रिक कारच्या रेंजबद्दल लोक नेहमी चिंतेत असतात. इलेक्ट्रिक कार कंपनीनं सांगितलेल्या रेंजपेक्षा कमी रेंज देतात, अशी अनेकांची तक्रार असते. परंतु असं का होतं? इलेक्ट्रिक कारची रेंज कंपनीने सांगितलेल्या रेंजपेक्षा कमी का होत असेल? इलेक्ट्रिक कार खरेदी करताना तुम्ही तिची नेमकी रेंज किती आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक कारच्या खरेदीकडे लोकांचा वाढला असला तरी चार्जिंग स्टेशन्सची कमी आणि सामान्य स्थितीत चार्ज करण्यासाठी लागणारा वेळ यामुळे लोकांच्या काही समस्या नक्कीच निर्माण झाल्या आहेत. याशिवाय इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यानंतर तिच्या रेंजबद्दलही लोकांना सामना करावा लागतो. खरं तर, जेव्हाही आपण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करायला जातो तेव्हा त्यांची रेंज सांगूनच त्यांची विक्री केली जाते आणि लोक त्याच प्राधान्याने खरेदी करतात. परंतु कंपनीने दावा केलेली रेंज आणि सामान्य स्थितीत वाहन चालविल्यानंतर येणारी रेंज यात फरक असतो.

कंपनीनं सांगितलेल्या रेंजपेक्षा इलेक्ट्रिक वाहनं रेंज कमी का देतात?

इलेक्ट्रिक कारच्या दावा केलेली रेंज ही प्रत्यक्ष धावण्याच्या परिस्थितीत चाचणी केली जात नाही. ती रेंज चाचणी परिस्थितीतील असते. जिथे रहदारी, रस्ते अडथळे, खराब रस्ते किंवा सिग्नल अशा गोष्टी नसतात. तसेच एसी किंवा कोणत्याही अतिरिक्त इलेक्ट्रिक फिटमेंटसह ही रेंज असते. यामुळं बॅटरी अजिबात वाया जात नाही आणि ती पूर्णपणे वाहन चालविण्यासाठी वापरली जाते. म्हणूनच इलेक्ट्रिक वाहनाची चाचणी करताना रेंज उच्च असते.

तुमची कार नेमकी किती रेंज देते?

इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना वास्तविक रेंज काढण्याचा सोपा मार्ग म्हणजे कंपनीनं दिलेल्या रेंजमधून 25 टक्के वजा करणे. उदाहरणार्थ, वाहनाची चाचणी रेंज 300 किमी असल्यास त्यातून 75 किमी वजा करा. म्हणजेच इलेक्ट्रिक कारची टेस्टिंग रेंज 300 किमी असली तरी सामान्य परिस्थितीत त्या २२५ ते २३० किमी रेंज देतात.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?