मनोरंजन

विद्यार्थ्यांचा संघर्ष दाखवणारा '12th Fail' उद्या येणार प्रेक्षकांच्या भेटीला; स्क्रनिंग पाहूल कमल हसन देखील भारावले

नवशक्ती Web Desk

'12th Fail'या चित्रपटाची प्रेक्षकवर्ग आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतल होतं. मागील काही दिवसांपासून या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवर अनेक सेलिब्रेटींनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. विधू विनोद चोप्रा यांनी '12th Fail'या चित्रपटाचं दिग्दर्शिनं केलं आहे.

'12th Fail'सिनेमांत प्रसिद्ध अभिनेता विक्रांत मेस्सी आणि मेधा शंकर या दोघांच्या प्रमुख भूमिका आहेत. उद्या(२७ ऑक्टोबर) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं काही शहरांमध्ये खास स्क्रिनिंग देखील आयोजित करण्यातं आलं होतं. यावेळी अनेक मान्यवरांनी हा चित्रपट बघितल्यानंतर त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील चाहत्यांचा, नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन यांनी '12th Fail'या चित्रपटासाठी मेकर्सला धन्यवाद दिले आहेत.

'युपीएससी' या स्पर्धा परीक्षेसाठी मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संघर्ष आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यांना चित्रबद्ध करुन त्याची उत्तम मांडणी या चित्रपटातून करण्यात आली आहे. आतापर्यंत '12th Fail'या चित्रपटाचं भोपाळ, मुंबई आणि दिल्लीमध्ये स्क्रिनिंग झालं आहे. या स्क्रिनिंगला युवावर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाल्याच दिसून आलं आहे. चैन्नईमध्ये देखील त्याचं स्क्रिनिंग पार पडलं होतं. त्यावेळी इथं कमल हासन उपस्थित होते. "मी हा चित्रपट पाहिल्यानंतर खूपच प्रभावित झालो आहे. मला खूप आनंदही झाला. खूप वेळानंतर मला चांगला चित्रपट पाहिल्याचं समाधान मिळालं. अशी प्रतिक्रिया कमल हसन यांनी याप्रसंगी दिली. तसंच या चित्रपटासाठी मी विधू विनोद चोप्रा यांना धन्यवाद देतो,असं देखील कमल हसन म्हणाले.

"आमच्यासोबत या, तुमची स्वप्नं पूर्ण होतील..."नंदुरबारमधील सभेत मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना 'सर्वोच्च' दिलासा; १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

Narendra Dabholkar Murder Case: दोघांना जन्पठेप, तिघांची निर्दोष सुटका; ११ वर्षांनी आला निकाल

Madhuri Dixitनं खरेदी केली तब्बल 4 कोटी रुपयांची कार, फीचर्स ऐकून व्हाल चकित

अक्षय तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य