मनोरंजन

चार स्टेप्सचा मर्डर प्लॅन उलगडला… ‘आतली बातमी फुटली’च्या दुसऱ्या टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला; प्रदर्शनाची तारीख जाहीर

Aatli Baatmi Futlii Teaser :पती-पत्नीच्या नात्यातील कटुतेतून खुनाच्या सुपारीपर्यंत पोहोचलेली कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘आतली बातमी फुटली’ हा नवाकोरा मराठी चित्रपट. या चित्रपटाचा दुसरा रंजक टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यात गूढ, रहस्य, विनोद आणि थरार यांचा उत्तम मेळ पाहायला मिळतो.

Mayuri Gawade

पती-पत्नीच्या नात्यातील कटुतेतून खुनाच्या सुपारीपर्यंत पोहोचलेली कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘आतली बातमी फुटली’ हा नवाकोरा मराठी चित्रपट. या चित्रपटाचा दुसरा रंजक टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यात गूढ, रहस्य, विनोद आणि थरार यांचा उत्तम मेळ पाहायला मिळतो.

या टिझरमध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्या विनोदी शैलीत गंभीर प्रसंग रंगवताना दिसतो. तर मोहन आगाशे यांचे संवाद आणि सिद्धार्थची देहबोली यातून प्रसंग अधिक उठून दिसतात.

विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार दिग्दर्शित या चित्रपटात मोहन आगाशे, रोहिणी हट्टगंडी आणि सिद्धार्थ जाधव हे तीन दिग्गज कलाकार प्रथमच एकत्र आले आहेत. त्यांच्यासोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे आणि त्रिशा ठोसर यांची दमदार साथ आहे.

१९ सप्टेंबर २०२५ रोजी ‘आतली बातमी फुटली’ हा चित्रपट प्रदर्शित होईल. नात्यांमधील अविश्वास, फसवणूक आणि त्यामागील धक्कादायक सत्य उघड करत हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भन्नाट मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे.

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल