(संग्रहित छायाचित्र) एएनआय
मनोरंजन

'भिडू' बोलून 'जग्गूदादा'ची नक्कल महागात पडणार! जॅकी श्रॉफची हायकोर्टात धाव; खटला केला दाखल

बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी त्यांचे व्यक्तिमत्व आणि प्रसिद्धी हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Swapnil S

बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी त्यांचे व्यक्तिमत्व आणि प्रसिद्धी हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

संमतीशिवाय नाव, छायाचित्रे, आवाज आणि "भिडू" या शब्दाचा कथित 'अनधिकृत' वापर केल्याबद्दल जॅकी श्रॉफने मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात अनेक संस्थांविरुद्ध खटला दाखल केला.

अनेक संस्था परवानगीशिवाय त्याचे नाव, फोटो, आवाज आणि त्याचा प्रसिद्ध डायलॉग वापरत असल्याचा आरोप जॅकीच्या वतीने करण्यात आला असून जे त्याच्या परवानगीशिवाय व्यावसायिक फायद्यासाठी याचा गैरवापर करत आहेत त्यांच्याविरुद्ध हा खटला दाखल करण्यात आला आहे. 'लाइव्ह अँड लॉ' च्या वृत्तानुसार श्रॉफच्या याचिकेवर उद्या, बुधवारी न्यायालयासमोर सुनावणी होणार आहे.

यापूर्वी अनिल कपूर आणि अमिताभ बच्चन यांसारख्या अभिनेत्यांनीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता