मनोरंजन

अभिनेता सलमान खानची पोस्ट तुफान व्हायरल ; कायदेशीर कारवाई करण्याचा दिला इशारा

या पोस्टमध्ये त्याने सलमान खान आणि त्याची कंपनी कोणत्याही सिनेमासाठी कोणालाही कास्ट करत नसल्याचं म्हटलं आहे

नवशक्ती Web Desk

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा त्याच्या 'किसी का भाई किसीकी जान' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र त्याचा हा चित्रपट आपली जादू जाखवालया अपयशी ठरला. आता सलमान खान त्याच्या आगमी 'टायगर ३' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बऱ्याचं दिवसांनंतर सलमान खान आणि कतरिना कैफ यांची जोडी धमाका करताना दिसणार आहे. दिवाळीच्या दरम्यान हा सिनेमा रिलीज होणार आहे.

सलमान हा नुकताच एक पोस्टमुळे चर्चेत आला आहे. त्याने केलेली ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. .या पोस्टमध्ये त्याने सलमान खान आणि त्याची कंपनी कोणत्याही सिनेमासाठी कोणालाही कास्ट करत नाही. या पोस्टमध्ये त्याने पुढे म्हटलं आहे की, आम्ही कोणत्याही कास्टिंग एजंटची नियुक्ती देखील केलेली नाही. कृपया तु्म्हाला कास्टिंग संबंधित कोणताही मेल किंवा मेसेज मिळाल्यावर अजिबात लक्ष देऊ नका. तसंच कोणत्याही मेलवर विश्वास ठेवू नका. जर कोणी सलमान खान आणि त्याच्या चित्रपटाचे नाव चुकीच्या पद्धतीने वापरताना दिसलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. असं इशारा सलमान खान याने या पोस्टमधून दिला आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत