मनोरंजन

डीएमडीकेचे संस्थापक, अभिनेते विजयकांत यांचे निधन

द्रमुक आणि अद्रमुक यांना पर्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यासाठी त्यांनी डीएमडीकेची स्थापना केली होती.

Swapnil S

चेन्नई : डीएमडीकेचे संस्थापक-नेते आणि लोकप्रिय तमिळ अभिनेते विजयकांत यांचे गुरुवारी आजारपणामुळे निधन झाले. द्रमुक आणि अद्रमुक यांना पर्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यासाठी त्यांनी डीएमडीकेची स्थापना केली होती.

त्याच्या उदारतेसाठी त्याच्या चाहत्यांनी 'करुप्पू एमजीआर' (ब्लॅक एमजीआर) म्हणून कौतुक केले, विजयकांत गेल्या ४-५ वर्षांपासून आजारी होते. त्यांची पत्नी प्रेमलता यांनी १४ डिसेंबर रोजी औपचारिकपणे डीएमडीकेची सूत्रे हाती घेतली आणि पक्षाच्या बैठकीत सरचिटणीस प्रेमलता यांची घोषणा करण्यात आली.

कॅप्टन विजयकांत यांना न्यूमोनियाच्या उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर ते व्हेंटिलेटरवर होचेय मात्र, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनंतरही २८ डिसेंबर रोजी सकाळी त्यांचे निधन झाले, असे एमआयओटी इंटरनॅशनल हॉस्पिटलने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

१९९१ च्या ब्लॉकबस्टर तमिळ चित्रपट 'कॅप्टन प्रभाकरन' मध्ये आयएफएस अधिकाऱ्याची भूमिका साकारल्यानंतर विजयकांत 'कॅप्टन' म्हणून लोकप्रिय झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विजयकांत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. डीएमडीकेने सांगितले की, २९ डिसेंबर रोजी सायंकाळी पावणेपाच वाजता पक्षाच्या मुख्यालयाच्या आवारात अंतिम संस्कार केले जातील.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली

मुद्रांक शुल्कातील निधी थेट देणार; स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नवीन कार्यपद्धती - बावनकुळे