मनोरंजन

नितीन देसाईंच्या आत्महत्येवर आदेश बांदेकर यांनी व्यक्त केली खंत, म्हणाले...

नितीन देसाई यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत तसंच सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे

नवशक्ती Web Desk

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जत येथील स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी आपलं जीवन संपवलं. त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीत तसंच सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. देसाई यांनी उचललेल्या टोकाच्या पाऊलाबद्दल सर्वांनाच धक्का बसला आहे. आता अभिनेते आदेश बांदेकर यांनी त्यांच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेते आदेश बांदेकर एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, "कलादिग्दर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं नाव जगाच्या नकाशावर नेण्यात नितीनचा मोठा वाटा आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. त्याच्या कामाबद्दल प्रत्येकालाच अभिमान वाटायचा. नितीन हा जगन्मित्र होता. त्याचं सर्वांशी उत्तम बोलणं, संवाद साधणं सुरु असायचं. नितीननं आत्महत्या करणं हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे. ज्या क्षणी मला ही बातमी कळली. त्या क्षणी मला खूप वाईट वाटलं." असं बांदेकर म्हणाले.

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, "त्यानं बोलायला हवं होतं. संवाद साधायला हवा होता. पण काहीच नाही. त्याचा कधी फोन आला तर तो सिद्धीविनायकाच्या दर्शनाला येतोय, असं सांगण्यासाठी असायचा. मी अनेक टप्प्यांवर त्याचा प्रवास बघितला आहे. आम्ही विविध संकल्पनांसाठी एकत्र काम केलंय. मी मोठमोठ्या सोहळ्यांचं दिग्दर्शन करत असताना तो असायचा. त्यानं असं का करावं? हा प्रश्न पडला आहे." अशी खंत आदेश बांदेकर यांनी व्यक्त केली आहे.

Mumbai : पावसाळ्यात मेट्रो सज्ज; MMRDA ची एआय-आधारित पेन्टाेग्राफ मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित

लातूरला नांगराच्या औताला पत्नीला जुंपले; आर्थिक परिस्थिती नसल्याने शेतकऱ्याची हतबलता

Mumbai : पालिकेची बेस्टला ५०० कोटींची मदत; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळाला बेस्ट दिलासा

MIDC कर्ज उभारणी अधिकारात वाढ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Jammu-Kashmir : ‘झोजिला’चा मार्ग मोकळा; गडकरी यांच्या हस्ते अंतिम ‘ब्रेकथ्रू’ साध्य