Instagram
मनोरंजन

Ashok Saraf,Rohini Hattangadi: अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार

Akhil Bharatiya Marathi Natya Parishad Award: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार नाट्य सिने अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना देण्यात येणार आहे.

Tejashree Gaikwad

Jeevan Gaurav Puraskar 2024: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई च्या वतीने दरवर्षी १४ जून रोजी गो.ब. देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. मागील तीन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते. नाट्य परिषदेची निवडणूक पार पडताच, कमी वेळात तातडीने नवनिर्वाचित नियामक मंडळाने जीवनगौरव पुरस्कार देण्याचे योजिले व पुरस्कार देण्यात आले.

प्रशांत दामलेंनी दिली माहिती

यंदाच्या वर्षी १४ जून २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टॅक रोड, मांटुगा -माहीम, मुंबई येथे सायंकाळी ४ वाजता सर्व पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली आहे.

नाट्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या नाट्यकर्मींचा सन्मान नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी केला जातो. यानिमित्ताने कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त घेण्यात आलेला 'नाट्यकलेचा जागर' यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन कार्यक्रम यानिमित्ताने सादर होणार आहेत. कलावंत व नाट्य रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्री. प्रशांत दामले यांनी केले आहे.

IndiGoची मोठी घोषणा; प्रवाशांचे पैसे परत मिळणार, री-शेड्युलिंग शुल्क शून्य

नाशिकच्या १८०० झाडांवर कुऱ्हाड? मनसेनंतर आदित्य ठाकरेंची एंट्री; भाजप-बिल्डर लॉबीवर घणाघात, "भाजपच्या बिल्डर मित्रांची...

Thane : भिवंडीत डॉ. बाबासाहेबांच्या श्रद्धांजली बॅनरचा अपमान; दोघांविरोधात गुन्हा दाखल

महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आंबेडकरांना अभिवादन; "त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारत...

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी झाली सरवणकरांची सून; लग्नानंतर नवदाम्पत्य पोहचलं सिद्धिविनायक मंदिरात! पाहा खास Photos