बिग बॉस मराठीमध्ये होणार खिलाडी कुमारची एंट्री Canva
मनोरंजन

Bigg Boss Marathi मध्ये होणार खिलाडी कुमारची एंट्री, स्पर्धकांसोबत करणार कल्ला

रविवारी सुद्धा भाऊच्या धक्क्याचा विशेष भाग तुमच्या भेटीला येणार आहे. या भागात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची एंट्री होणार असून तो स्पर्धकांसोबत कल्ला करताना दिसणार आहे.

Pooja Pawar

मुंबई : बिग बॉस मराठी सीजन ५ हा शो सध्या प्रचंड गाजत असून महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात येथे होणाऱ्या गोष्टींची चर्चा सुरु आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या आठवड्यातील भाऊचा धक्का हा खास विकेंड एपिसोड शनिवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. यात रितेश देशमुखने आठवड्याभरात बिग बॉसच्या घरात अयोग्य वागणाऱ्या स्पर्धकांचा क्लास घेतल्याचे पाहायला मिळाले.

आज रविवारी सुद्धा भाऊच्या धक्क्याचा विशेष भाग तुमच्या भेटीला येणार आहे. या भागात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची एंट्री होणार असून तो स्पर्धकांसोबत कल्ला करताना दिसणार आहे.

अक्षय कुमारचा नवा सिनेमा 'खेल खेल मे' १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने अक्षय कुमार सोबतच या सिनेमाची संपूर्ण टीम बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर आली होती. जिओ सिनेमावर रविवारच्या भागाचे काही प्रोमो प्रदर्शित झाले असून यात अक्षय कुमार स्पर्धकांसोबत गेम्स खेळताना तर कुठे त्यांची मस्करी करताना दिसतोय. अक्षय सोबत या सिनेमाचे कलाकार वानी कपूर, फर्दिन खान, प्रग्या जैस्वाल इत्यादी आले होते.

बिग बॉस मराठीचा एक प्रोमो समोर आला असून यात अक्षय अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्याशी संवाद साधताना दिसत आहे. यावेळी अक्षय वर्षा यांना पाहून म्हणाला, "वर्षा किती वर्षांनी दिसतेस". तर अक्षयने डीपी म्हणजेच धनंजय पाटील यांना "घरात मटण मिळतंय का?" असा प्रश्न विचारला. तर सुरज चव्हाण सोबत सुद्धा त्याने झापूकझुपकची स्टेप केली.

Ahilyanagar : राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन

२०४० पर्यंत भारतीय उतरणार चंद्रावर; ‘इस्रो’चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांची माहिती

सार्वजनिक ठिकाणी संघाच्या हालचालींवर नियंत्रण; कर्नाटक मंत्रिमंडळाचा निर्णय

ट्रम्प यांचे आगीत तेल! रशियाकडून तेल खरेदी थांबविण्याचा मोदींनी शब्द दिल्याचा दावा

मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी; दिवाळीनिमित्त खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ