मनोरंजन

'OMG 2'मध्ये अक्षय कुमारने घेतलं ३५ कोटींचं मानधन? निर्मात्यांनीच केला खुलासा, म्हणाले...

नवशक्ती Web Desk

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा बहुचर्चित असा 'ओह माय गॉड' या चित्रपटाचा दुसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातून लैंगिक शिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आलं आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारने महादेवाची भूमिका साकारली आहे. ११ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली असून हा चित्रपट आता १०० कोटींचा गल्ला जमवण्याच्या मार्गावर आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला असून सगळीकडे लोकं चित्रपटांच्या कलाकारांचं कौतुक करताना दिसत आहेत.

'ओह माय गॉड २' या चित्रपटाचा बजेट १५० कोटी असून या चित्रपटासाठी अक्षय कुमारने ३५ कोटी रुपयांचं मानधन घेतलं असल्याचं सगळीकडे बोललं जातंय. मात्र, यावर आता चित्रपट निर्मात्यांनी चांगलंच उत्तर दिलं आहे. 'ओह माय गॉड २'चे निर्माते अजित अंधारे यांनी 'पिंकविला' या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, "अभिनेता अक्षय कुमारने 'ओह माय गॉड २' साठी एक रुपयाही घेतला नाही. याउलट, हा सिनेमा बनवताना आर्थिक पातळीवरील जोखीम घेताना तो निर्मात्याच्या पाठीशी खंबीर उभा राहिला.

अजित पांढरे पुढे बोलताना म्हणाले की, "अभिनेता अक्षय कुमार आणि आमचे खूप जुने संबंध आहेत, एवढेच नव्हे तर 'ओह माय गॉड', 'टॉयलेट एक प्रेम कथा', 'स्पेशल २६'च्या वेळेपासून आम्ही एकमेकांना समजून घेत आलो आहोत. अर्थपूर्ण आणि आशयगन स्क्रिप्ट असेल तर मी नेहमीच अक्षयच्या पाठीशी उभं राहत आलो आहे. अक्षय शिवाय हा धोका पत्करणं अशक्य होतं. तो या चित्रपटात आर्थिक आणि क्रिएटिव्ह पद्धतीने सक्रियपणे सहभागी होता." याच बरोबर हा चित्रपट १५० कोटी नाही, तर ५० कोटींपेक्षा कमी बजेटमध्ये करण्यात आला आहे, असा खुलासाही पांढरे यांनी केला. 'ओह माय गॉड २' या सिनेमात अक्षय कुमारशिवाय अभिनेता पंकज त्रिपाठी आणि यामी गौतमी यांनी देखील महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त