मनोरंजन

खान कुटुंबात छोट्या परीचे आगमन! वयाच्या ५८ व्या वर्षी अरबाज खान झालाय दुसऱ्यांदा बाबा

वयाच्या ५८ व्या वर्षी अरबाज खान पुन्हा एकदा बाबा झाला आहे. त्याची दुसरी पत्नी शुराने एका चिमूकलीला जन्म दिला असल्याची माहिती समोर येत आहे.

Mayuri Gawade

अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अरबाज खान वयाच्या ५८ व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची दुसरी पत्नी शुरा खान दोन दिवसांपासून प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होती. शुराने गोंडस मुलीला जन्म दिल्याची माहिती समोर आली असून अरबाज आणि शूरा आता एका मुलीचे आई-बाबा झाले आहेत.

काही महिन्यांपूर्वी त्यांनी घरी चिमुकल्याचं आगमन होणार असल्याची गुड न्यूज दिली होती. मागच्या आठवड्यात शुराचा बेबी शॉवर कार्यक्रमदेखील झाला होता. ज्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

अरबाज खान आणि मलायका अरोरा

अरबाजने १९९८ मध्ये मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोराशी लग्न केले. अनेक वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला, पण त्यांचं नातं फार काळ टिकले नाही. अखेर २०१७ मध्ये दोघांचे घटस्फोट झाले. मलायकापासून अरबाजला 2002 मध्ये अरहान नावाचा मुलगा झाला. मलायकापासून वेगळे झाल्यानंतर अरबाजने २०२३ च्या डिसेंबर महिन्यात सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केले होते. हे दोघे २०२२ पासून एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर २ वर्षांनी हे दोघे आता आई-बाबा झाले आहेत.

'शक्ती'चा तडाखा बसणार; ७ ऑक्टोबरपर्यंत किनारपट्टीला धडकणार चक्रीवादळ; मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्गला सतर्कतेचा इशारा

दार्जिलिंगमध्ये भीषण भूस्खलन; १४ जणांचा मृत्यू, दुडिया पूल कोसळला

चेंबूरमध्ये पोलिसांची धडक कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा, ३३ जण ताब्यात

अंगणवाडी केंद्रे वाढणार; बालविवाह, हुंडा प्रथा रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा १२ ऑक्टोबरला मशाल मोर्चा; प्रलंबित मागण्यांसाठी १३ ऑक्टोबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन