बिग बॉस मराठी ५ च्या घरातील स्पर्धकांना किती मिळतंय मानधन?  Canva
मनोरंजन

निक्की तांबोळी ते वर्षा उसगांवकर...बिग बॉस मराठी ५ च्या घरातील स्पर्धकांना किती मिळतंय मानधन?

Pooja Pawar

Bigg Boss Marathi New Season : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ हा शो सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. सध्या बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींची चर्चा सोशल मीडियावर रंगत असून यावर प्रेक्षक चांगल्या वाईट प्रतिक्रिया नोंदवत आहेत. यंदाच्या सीजनमध्ये विविध क्षेत्रातील एकूण १६ स्पर्धकांनी या खेळात सहभाग घेतला आहे. यात प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, हास्यसम्राट पंढरीनाथ कांबळे आणि सोशल मीडिया स्टार अंकिता वालावलकर तसेच धनंजय पोवार यांचा समावेश आहे. बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांनी या खेळात सहभागी होण्यासाठी किती मानधन घेतले याविषयी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

सध्या बिगबॉस मराठीच्या घरात अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळी या दोघी अतिशय चर्चेत आहेत. पहिल्या आठवड्यात दोघींमध्ये झालेल्या भांडणावरून वीकेंडच्या वारला शो चा होस्ट रितेश देशमुख चांगलाच संतापला होता. मराठी माणसांची मेन्टॅलिटी काढल्याबद्दल निक्कीला रितेशने मराठी माणसाची माफी मागायला लावली होती. तर दुसऱ्या आठवड्यात अंकिता वालावलकर ही बिगबॉस मराठी सीजन ५ च्या घराची पहिली कॅप्टन झाली.

कोणाला मिळतंय सर्वाधिक मानधन?

समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना बिग बॉससाठी जवळपास दर आठवड्याला २. ५० लाख इतकं मानधन दिलं जातंय. तर यापूर्वी बिगबॉस हिंदीचा सीजन गाजवणारी अभिनेत्री निक्की तांबोळी हिला आठवड्याला ३. ७५ लाख रुपये मानधन देण्यात येतंय. तसेच गायक अभिजित सावंत याला सुद्धा बिग बॉससाठी जवळपास ३. २५ लाख रुपये देण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.

सोशल मीडिया स्टार्सला किती मानधन?

बिग बॉस मराठीच्या ५ व्या सीजनमध्ये यंदा सोशल मीडिया स्टार्सला सुद्धा संधी देण्यात आलेली आहे. कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध असणारी अंकिता वालावलकर हिला बिग बॉससाठी दर आठवड्याला जवळपास ५० ते ६० हजार इतकं मानधन मिळत असल्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार धनंजय पोवार याला प्रत्येक आठवड्यासाठी सुमारे ६० हजार इतकं मानधन दिलं जातंय. गुलीगत धोका फेम सुरज यादव याला बिग बॉससाठी जवळपास २५ हजार रुपये मानधन देण्यात येतंय. तर छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या घनश्याम दरोडे याला दर महिन्याला ४० टे ५० हजार इतकं मानधन दिल जातंय अशी चर्चा आहे.

रितेश देशमुखला मांजरेकरांपेक्षा दुप्पट मानधन?

बिग बॉस मराठीचे ४ सीजन हे अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी होस्ट केले होते. मात्र यंदा सीजन ५ साठी अभिनेता रितेश देशमुखकडे होस्टची जबाबदारी देण्यात आलेली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेता रितेश देशमुख याला विकेंडच्या एपिसोडसाठी तब्बल ४० ते ५० लाख इतकं मानधन देण्यात येतंय. तर बिग बॉस मराठीचे आधीचे होस्ट महेश मांजरेकर यांना विकेंड एपिसोडसाठी २० ते २५ लाख रुपये देण्यात येत होते.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत