@abdu_rozik/ Instagram
मनोरंजन

Abdu Rozik: बिग बॉस फेम अब्दू रोजिक लग्नाच्या तयारीत, सोशल मीडियावरून शेअर केली गोड बातमी

Bigg Boss 16 fame Abdu Rozik : बिग बॉस फेम अब्दू रोजिकची छोटा भाईजान म्हणूनही ओळख आहे. २० वर्षीय अब्दू लवकरच लग्न करणार आहे, अशी माहिती त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत दिली.

Tejashree Gaikwad

Singer Abdu Rozik Getting Married: अब्दू रोजिक म्हणजेच बिग बॉसमधून प्रसिद्ध झालेला छोटा भाईजान भारतात खूप लोकप्रिय आहे. मूळचा तझाकिस्तानी गायक जगभरात प्रसिद्ध आहे. चाहते फक्त त्याच्या गाण्यांचेच नाही तर त्याच्या क्यूटनेसचेही वेडे आहेत. अब्दू रोजिकने इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला, जो प्रचंड व्हायरल झाला आहे. या जगातील सर्वात छोट्या गायकाने तो लग्न करणार असल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. अब्दू रोजिकने त्याच्या चाहत्यांना त्याच्या भावी पत्नी आणि लग्नाबद्दल आनंदाची बातमी दिली आहे. अब्दूने त्याच्या पत्नीसाठी खरेदी केलेल्या हिरेजडीत अंगठीची झलकही व्हिडीओमध्ये दाखवली आहे.

बघा व्हिडीओ

बिग बॉस १६ चा स्पर्धक आणि इंटरनेट सेन्सेशन अब्दू रोजिक जुलै २०२४ मध्ये त्याच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत लग्न करणार आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने आपला आनंद व्यक्त केला आणि कॅप्शन लिहले की, "मी माझ्या आयुष्यात कधीच कल्पना केली नव्हती की मला प्रेम मिळेल.... ७ जुलै ही तारीख लक्षात ठेवा.... मी किती आनंदी आहे ,हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.”

कोण आहे होणारी बायको?

खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार, अब्दू शारजाहमधील अमीराती मुलगी अमीरासोबत लग्न करणार आहे. त्यांचे इंटिमेट लग्न युएइ (UAE) मध्ये होणार आहे. अब्दू २० वर्षांचा आहे, तर अमीरा १९ वर्षांची आहे.

छोटा भाईजान बद्दल

अब्दू रोजिक हा प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार आहे. तो एक तझाकिस्तानी गायक आहे. टीव्ही रिॲलिटी शो 'बिग बॉस'मध्ये सहभागी झाल्यामुळे तो भारतात चर्चेत आला. त्याला छोटा भाईजान हे नावही भारतातील चाहत्यांनी दिलं. गायक अब्दू रोजिकने तरुण वयातच कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक