मनोरंजन

Bigg Boss 16 : पुण्याचा एमसी स्टॅन ठरला बिग बॉस १६चा विजेता; उपविजेता शिव ठाकरे म्हणाला...

अखेर बिग बॉस १६चा (Bigg Boss 16) विजेता म्हणून एमसी स्टॅनचे नाव घोषित करण्यात आले, तर शिव ठाकरे हा उपविजेता ठरला

प्रतिनिधी

बिग बॉस १६चा फिनाले रविवारी पार पडला. यंदा शिव ठाकरे, एमसी स्टॅन, आणि प्रियंका चाहर चौधरी यांच्यामध्ये तगडी लढत झाली. शिव ठाकरे किंवा प्रियांका चौधरी या सीजनचे विजेता होणार अशा चर्चा रंगल्या असतानाच पुण्यात राहणारा आणि गरीब परिस्थितीवर मात करत रॅपर म्हणून नाव कमावणाऱ्या एमसी स्टॅनने बाजी मारली. तो बिग बॉस १६चा विजेता ठरला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, त्याच्या विजयाने शिव ठाकरेही आनंद व्यक्त केला. उपविजेत्या ठरलेल्या शिव ठाकरेने प्रतिक्रिया देताना म्हंटले की, "मी एक चांगला खेळाडू आहे, पण एमसी स्टॅन हा खरा माणूस आहे."

शिव ठाकरेने बाहेर माध्यमांनाही संवाद साधताना म्हणाला की, "साहजिकच मला जिंकण्याची अपेक्षा होती. मी खूप मेहनतीने खेळ खेळलो आणि नेहमीच चांगली कामगिरी केली. एखाद्या मुद्यासाठी आवाज उठवणे असो किंवा कोणत्याही कामात माझे सर्वोत्तम देणे असो, मी माझे १०० टक्के दिले. किमान हिंदी प्रेक्षक मला ओळखत आहेत यातच मी आनंदी आहे." अशा भावना त्याने व्यक्त केल्या.

एमसी स्टॅनने विजयाबद्दल सांगताना म्हणाला की, "सुरुवातील बिग बॉसच्या घरात आल्यानंतर मला घरातून पळून जावेसे वाटत होते. मला समजताच नव्हते की नक्की मला काय होता आहे ते. आपण अनेकदा चुकीचे शब्द वापरले की सलमान खान आपल्याला समजवायचा, चांगले बोल सांगायचा ते मी शक्य होईल तिथे मी पाळले. पण काही लोक वागायचेच असे की बोलावेच लागायचे." असे म्हणत तो अनेकदा भावुक झाला. त्याने आपल्या विजयासाठी चाहत्यांचे मनापासून आभार मानले.

देशभरातील सार्वजनिक ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना हटवा; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

लाडकी बहीण योजनेत १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य

Thane : पालिका निवडणुकीची सूत्रे आमदार संजय केळकरांकडे; ठाण्यात शिंदे सेना आणि भाजपमध्ये तणाव वाढणार

बांगलादेशात कांद्याचे भाव शंभरी पार; भारतीय निर्यातदारांकडून आयातबंदी उठवण्याची मागणी

वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ! तिसऱ्या फेरीनंतरही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ३८७ जागा रिक्त