मनोरंजन

बिग बॉसच्या 'या' अभिनेत्रीने केला राजकारणात प्रवेश

कलाक्षेत्रासोबत राजकारणातही सक्रिय राहणार!

निलीमा कुलकर्णी

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे ही नेहमीच कलाक्षेत्रासोबत सामाजिक कार्यातही सहभागी होत असते. त्याचप्रमाणे ती सामाजिक विषयांवरील चर्चेत हिरीरीने भाग घेत असते. तिच्या मतांवर ती ठाम असते. बिग बॉसच्या घरात देखील आपण तिला असंच ठामपणे व्यक्त होताना पाहिलंय.

आता मेघा धाडे नव्या इनिंगसाठी सज्ज झाली आहे. तिने राजकारणात प्रवेश करायचा असं ठरवलंय.

नुकताच अभिनेत्री मेघा धाडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री विक्रांत पाटील , श्री विजय चौधरी व सांस्कृतिक प्रकोष्टच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीमती प्रिया बेर्डे उपस्थित होते.

त्यामुळे आता मेघा धाडे यापुढे कोणकोणत्या सामाजिक प्रश्नांकडे लक्ष देणार, त्याचसोबत कलाक्षेत्रासाठी आणि तेथील प्रश्नांसाठी आवाज उठवणार का, हे आता पाहायचं.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण

GDP अंदाजात ४० आधार अंकांनी वाढ; भारताच्या आर्थिक वर्ष २६ साठी ‘OECD’चे भाकीत