मनोरंजन

Bigg Boss Marathi 5: वर्षा ताईंनी केली अरबाजला नॉमिनेट न करण्याची विनंती, आज रंगणार जादुई दिव्याचा इम्युनिटी टास्क

Nomination Task: आज घरात नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे. नॉमिनेशन टास्कमध्ये या आठवड्यात कोणते सदस्य नॉमिनेट होणार हे पाहायाला मिळेल.

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi Day 45 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन ४४ दिवस पूर्ण झाले असून आज ४५ वा दिवस सुरू आहे. आजचा ४५ दिवस खूपच कमाल असणार आहे. संग्रामच्या येण्याने 'बिग बॉस मराठी'च्या घरात वादळ आलं आहे. पण निक्की आणि अरबाजने त्याला हलक्यात घेतलेलं कालच्या भागात पाहायला मिळालं. आज घरात नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे. नॉमिनेशन टास्कमध्ये या आठवड्यात कोणते सदस्य नॉमिनेट होणार हे पाहावे लागेल.

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये घरात नॉमिनेशन टास्क पार पडताना दिसत आहे. जादुई दिव्यात इम्युनिटी बंदिस्त आहे. नॉमिनेशनच्या टास्कमध्ये कोणाला मिळणार जादुई दिव्याची इम्युनिटी हे पाहावे लागेल. प्रोमोमध्ये वर्षा ताई अरबाजकडे नॉमिनेट न करण्याची विनंती करताना दिसत आहेत. तर अंकिताने जान्हवीला नॉमिनेट केलेलं पाहायला मिळत आहे. जान्हवीला मात्र अंकिताचा हा निर्णय पटलेला नाही.

अरबाजच्या कॅप्टनसीवरून सगळे घेतायत त्याची फिरकी

अरबाजच्या कॅप्टनसीप्रकरणावरुन आजच्या भागात डीपी दादा, पॅडी दादा, अंकिता आणि संग्राम त्याची फिरकी घेताना दिसणार आहेत. संग्राम म्हणतोय,"याला म्हणतात पायावर दगड नाही तर दगडावर पाय मारणं". त्यामुळे प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन होणार आहे.

मुंबईत १ लाख झाडे लावण्याचा संकल्पच महापौर रितू तावडे यांच्याकडून हरित मुंबई अभियानाला गती

Navi Mumbai : पाणी बचतीसाठी कठोर उपाययोजना; अपव्यय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा; वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल बंदचे आदेश

'नहीं बोलूंगा मराठी!'; मुंबई सेंट्रल स्थानकावरील चौकशी कक्षात रेल्वे कर्मचाऱ्याची अरेरावी, VIDEO व्हायरल

Ambernath : घरात CCTV लावून ठेवायचा पाळत; लग्नानंतर ४८ दिवसांत विवाहितेची आत्महत्या; डॉक्टर पतीसह तिघांना अटक

मुंबईकरांच्या लोकल प्रवासाला गती मिळणार; प्रकल्पांसाठी 'एमआरव्हीसी'ला हवेत ६४,६४४ कोटी