मनोरंजन

Bigg Boss Marathi 5: "...तर स्वतःचं नाव नाही लावणार"; संग्राम चौगुलेच्या 'त्या' कृतीमुळे निक्की तांबोळी भडकली

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi New Season: गेल्या दीड महिन्यांपासून बिग बॉस मराठी ५ मधील सर्वच स्पर्धक उत्तम खेळत आहेत. याचदरम्यान आता या घरात एक मोठा ट्विस्ट आला आहे. या पाचव्या पर्वात पहिल्या वाईल्ड कार्डची एन्ट्री होत आहे. संग्राम चौगुले या सुप्रसिद्ध शरीरसौष्ठवपटूची घरात एन्ट्री होत आहे. संग्राम चौगुले हा बिग बॉस मराठी ५ चा पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक ठरला आहे. संग्रामला घरात आल्या आल्या बिग बॉसने एक टास्क दिल्याचे आताच आलेल्या प्रोमोमध्ये दिसून येत आहे. याच टास्क दरम्यान त्याच निक्की तांबोळीसोबत वाजल्याचे दिसत आहे. तसेच तो अरबाज पटेलला चॅलेंज देताना दिसला आहे.

संग्राम चौगुलेच्या कृतीमुळे निक्की तांबोळी भडकली

सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या प्रोमोमध्ये दिसून येत आहे की बिग बॉस घोषणा करतात, “या जादुई विहिरीत असे काही सदस्य पडतील, जे अपात्र आहेत.” हा टास्क संग्राम करणार असल्याचे प्रोमोमध्ये दिसते. बिग बॉसच्या घोषणे नंतर संग्राम म्हणतो की मी निक्कीला सांगेन त्यांना पाण्यात जायचे आहे. त्यावर निक्की म्हणते की, “मी मेडिकल कंडिशनमुळे पाण्यात उतरू शकत नाही.” यावर संग्राम बिग बॉसला सांगतो की, “बिग बॉस मी यांना ढकलणार आहे.” त्यावर निक्की त्याला म्हणते, “तुम्ही मला सांगूच शकत नाही.” याचदरम्यान विहिरीजवळच उभी असलेली निक्की जेव्हा धनंजय पोवारबरोबर बोलत असते,तेवढ्यात पाठीमागून संग्राम तिला ढकलतो. त्यानंतर निक्की जेव्हा पाण्यातून बाहेर येते, त्यावेळी ओरडून म्हणते, “हा माझ्याआधी बाहेर नाही निघाला ना, तर माझं नाव बदलव.”

अरबाजला दिलं चॅलेंज

अजून का प्रोमोमध्ये दिसून येत आहे की संग्रामने घरात आल्यावर एकप्रकारे अरबाजला धामकी दिली आहे. संग्राम अरबाजकडे बघत म्हणत आहे की, “तू आतापर्यंत जी काही पॉवर दाखवलीस ती वीक माणसांना दाखवली आहेस…तुला आता भेटेल फुल ऑन.”

कोण आहे संग्राम चौगुले ?

संग्राम चौगुले हा कोल्हापूरचा एक शरीरसौष्ठवपटू आहे ज्याने ८५ किलो गटात मिस्टर युनिव्हर्स २०१२ चे विजेतेपद पटकावले होते. संग्राम हा शिक्षणाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून, त्याने सहा वेळा मिस्टर इंडिया तर पाच वेळा मिस्टर महाराष्ट्रचा किताब पटकावला होता. संग्रामने २०१९ मध्ये रिलीज झालेल्या 'दंडम'मधून अभिनयात पदार्पण केले.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला