मनोरंजन

Bigg Boss Marathi 5: भाजीवरून निक्की आणि वर्षा ताईंमध्ये वाजलं, दोघींचं तू-तू, मैं-मैं संपेचना

Nikki Tamboli, Varsha Usgaonkar: 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये निक्की आणि वर्षा ताईंमध्ये भाजीवरुन भांड्याला भांड लागलेलं पाहायला मिळत आहे.

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi Day 46 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा आता सातवा आठवडा सुरू आहे. गेल्या आठवड्यात छोटा पुढारी घन:श्याम दरवडे घराबाहेर गेला. तर या आठवड्यातही एका सदस्याचा घरातील प्रवास संपणार आहे. त्यासाठी बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशन कार्य पार पडलं. या आठवड्यात सूरज घराचा कॅप्टन असल्याने तो सेफ आहे.

'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये निक्की आणि वर्षा ताईंमध्ये भाजीवरुन भांड्याला भांड लागलेलं पाहायला मिळत आहे. निक्की म्हणतेय,"इथे लोकांना या घरात लोकांना अन्न मिळत नाही आणि यांनी सरळ भाजी फेकली आहे". त्यावर उत्तर देत वर्षा ताई म्हणतात,"कारण मला ती खराब वाटली". पुढे दोघांची तू-तू, मैं-मैं पाहणं मात्र रंजक ठरणार आहे.

'हे' सदस्य झालेत नॉमिनेट

'बिग बॉस मराठी'चा सध्या सातवा आठवडा सुरू आहे. सातव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क नुकताच पार पडला आहे. सातव्या आठवड्यात अभिजीत सावंत, वैभव चव्हाण, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि आर्या जाधव हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

BEST बसचालकांची बेदरकारी वाढली; ८९८ जणांवर कारवाई, पैकी ७८९ कंत्राटी चालक, पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Mumbai : कुर्ल्यात अतिक्रमणांपासून मुक्ती; बेकायदा बांधकामे, स्टॉल जमीनदोस्त, एल विभागाची कारवाई

सीईटी परीक्षेचीही SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

संजुक्ता पराशर बनल्या ‘कोब्रा’ दलाच्या IG; कमांडो दलाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी

समान नागरी कायद्याला JDU ची सशर्त तयारी