मनोरंजन

Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरात दिलीये एका प्रेक्षकाला एन्ट्री; 'भाऊच्या धक्क्यावर' सदस्यांना मिळणार मोठं सरप्राईज!

Weekend Ka Vaar episode, aka Bhaucha Dhakka: 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनच्या 'भाऊच्या धक्क्या'चा नवा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणतोय,"'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सरप्राईजचा आहे.

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi New Season : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून साऱ्यांना हसवणाऱ्या पंढरीनाथ कांबळेची एन्ट्री झाली आहे. खऱ्या आयुष्यात वेगवेगळी कॅरेक्टर्स करणारा हा माणूस खरं तर स्वत:च एक कॅरेक्टर आहे. पण हा हास्यसम्राट 'बिग बॉस मराठी'च्या घरात खेळ खेळताना दिसून येत नाही. त्यामुळे रितेश भाऊ घरातील सदस्यांना एक खास सरप्राईज देत 'भाऊच्या धक्क्या'वर पॅडी भाऊचा चांगलाच क्लास घेताना दिसून येईल.

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनच्या 'भाऊच्या धक्क्या'चा नवा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणतोय,"'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सरप्राईजचा आहे. पण आता मी एक सरप्राईज देणार आहे. कोणालाच माहिती नाही, यंदा 'बिग बॉस'ने एका प्रेक्षकाला या घरात एन्ट्री दिली आहे. ते घरातच आहेत.. त्यांची घरावर नजर आहे.. ते लपूनछपून तुमचा खेळ पाहतायत, दाद देत आहेत... पण स्वत: काहीही करत नाहीत. त्या प्रेक्षकाला मी तुमच्यासमोर बोलावतोय.. आणि ते प्रेक्षक आहेत पंढरीनाथ कांबळे".. त्यानंतर पॅडीने दिलेल्या लूकवर रितेश त्याला असा लूक देऊ नको असं म्हणतो".

'बिग बॉस मराठी'च्या पहिल्यावहिल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ घरातील सर्वच सदस्यांची शाळा घेताना दिसून येणार आहे. एकंदरीतच या भाऊच्या धक्क्यावर सदस्यांना चांगलेच धक्के मिळतील. पण प्रेक्षकांसाठी मात्र हे धक्के पाहणं मनोरंजक असेल.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली